बंगळुरू Social Media Impact : मुंबईतील मीडिया मार्केटींग व्यावसायिकाचे केरळमध्ये महागडे इयरफोन हरवले होते. मात्र या सोशल मीडिया मार्केटींग करणाऱ्या तरुणानं सोशल माध्यमांतून ते परत मिळवले आहेत. निखिल जैन असं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महागडे इयरफोन परत मिळवणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे. निखिल जैन यांनी गोव्यातून हे महागडे इयरफोन परत मिळवले.
केरळमध्ये हरवले महागडे इयरफोन : निखिल जैन हे केरळमधील एका उद्यानात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपले महागडे इयरफोन बसमध्ये विसरले होते. निखिल जैन यांनी बस परत येण्याची वाट पाहिली, मात्र ती परत न आल्यानं कोणीतरी ते घेऊन गेल्याचं स्पष्ट झालं. निखिल जैन यांच्या फोनला रेंज नसल्यानं त्यांना ते ट्रॅक करता आले नाहीत. त्यामुळं त्यांनी दुसरीकडं जात डिव्हाईस ट्रॅक केले. तेव्हा त्यांच्या इयरफोनचे लोकेशन बदलत असल्याचं स्पष्ट झालं. आपल्यापासून इयरफोन 40 किमी दूर असल्याचं त्यांना लोकेशनवरुन स्पष्ट झालं.
हॉटेलमध्ये जाण्यास पोलिसांचा नकार : निखिल जैन यांची महागडी इयरफोन त्यांच्या जवळच्या हटेलमध्ये असल्याचं त्यांच्या लोकेशनवरुन कळालं. त्यामुळं त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेलच्या कोणत्या खोलीत डिव्हाईस आहे, ते स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळं हॉटेल प्रशासनानं ग्राहकांच्या विशेषाधिकाराचा हवाला देऊन ते शोधण्यास नकार दिला. त्यामुळं पोलिसांना काहीच मदत करता आली नाही.
इयरफोनचा मंगलोर ते गोवा प्रवास : निखिल जैन यांनी केरळमध्ये इयरफोन हरवला होता. मात्र ज्या व्यक्तीनं तो इयरफोन घेतला, तो व्यक्ती मंगलोरवरुन गोव्याला गेला. त्यामुळं निखिल जैन यांचा हरवलेल्या इयरफोनचा मंगलोर ते गोवा असा प्रवास झाला. 21 डिसेंबर 2023 रोजी निखिल जैन यांनी (@niquotein) X वर घटनास्थळासह पोस्ट केलं "मी अलीकडं केरळमध्ये माझं नवीन एअरपॉड गमावलं आणि ही व्यक्ती त्याच्यासोबत प्रवास करत आहे. ती व्यक्ती 2 दिवसापासून दक्षिण गोव्यात आहे, त्यामुळं ते तिथं राहतात असा माझा अंदाज आहे. इथं कोणी आसपास राहतो का?" काही मिनिटांतच, @ItsMeAshwin12 वापरकर्त्यानं गुगल स्ट्रीट मॅपच्या मदतीनं घराचं छायाचित्र पोस्ट केलं आणि संदेशासह, "एअरपॉड्स या घरामध्ये आहेत, करा आणि ते मिळवा" त्यानंतर 22 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे इयरफोन गोवा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले होते, असं निखिल जैन यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. त्यानंतर निखिल जैन यांनी आपल्या गोव्यात गेलेल्या मित्राकडून ते मागवून घेतलं. त्यानंतर इयरफोन मिळाल्यानंतर निखिल जैन यांनी गोवा पोलीस, केरळ पोलिसांसह नेटकऱ्यांचे आभार मानले.
हेही वाचा :