ETV Bharat / bharat

अभिनेत्री बनण्यासाठी कलकत्तामधून तरूणी पळाली; तरूणीला मुंबई पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात - amily report a missing complent to the police

मोठी अभिनेत्री बनायचे अशी खुणगाठ बांधून एक तरूणी कोलकात्याहून घरातून पळून ( young girl ran Away from home ) मुंबईत आली होती. गोरेगावमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीकडे पेईंगगेस्ट म्हणून राहू लागली. मात्र कोलकत्यात कुटुंबीयांनी पोलिसांत तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली ( family report a missing complent to the police ) . अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तिचा शोध घेऊन तरूणीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

Mumbai police
Mumbai police
author img

By

Published : Jun 25, 2022, 1:59 PM IST

मुंबई - मायानगरी मुंबईत अनेक तरुण-तरुणी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ( To try your luck in Bollywood ) येत असतात. मोठी अभिनेत्री बनायचे अशी खुणगाठ बांधून एक तरूणी कोलकात्याहून घरातून पळून ( young girl ran Away from home ) मुंबईत आली होती. गोरेगावमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीकडे पेईंगगेस्ट म्हणून राहू लागली. त्यानंतर तिने स्ट्रगल करायला सुरूवात केली. मात्र कोलकत्यात कुटुंबीय चिंतेत पडले असल्याने त्यांनी पोलिसांत तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली ( family report a missing complent to the police ) . अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तिचा शोध घेऊन त्या तरूणीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

तपासात सुरूवातीला तरूणीचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आला. तरूणीला कोलकात्याहून मुंबईत आणण्यात आले. आणि तिला गोरेगावच्या मोतीलाल नगरात ठेवण्यात आले. असा निष्कर्ष पोलिसांनी लावला होता. याबाबत कोलकाताच्या डोमजुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-11 च्या पथकाला मिळाली होती. मात्र त्यानंतर सदर तरुणी अल्पवयीन नसून तिला अभिनेत्री बनायचे होते. त्यासाठी ती कोलकात्याहून मुंबईला पळून आली होती. इथे आल्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती असे तिने पोलिसांना सांगितले.

प्रभारी निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारत घोणे, महिला एपीआय पूनम यादव, सहाय्यक फौजदार शिंदे, रावराणे या पथकाने त्या मुलीचा शोध सुरू केला होता. तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर ती तरुणी मोतीलाल नगर येथे पेईंग गेस्ट म्हणून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे जाऊन त्या तरुणीला ताब्यात घेऊन डोमजूर पोलिसांना तशी माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी तरुणीची चौकशी केली असता तिचे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा - एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरल! दिले 'हे' नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.