ETV Bharat / bharat

Go First Crisis : गो फर्स्ट एअरलाईनची विमान सेवा दोन दिवस राहणार बंद, मुंबईला येणारी दोन विमाने सुरतला वळविली! - श्रीनगर ते मुंबई

गो फर्स्ट विमान कंपनीची सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. गो फर्स्ट एअरलाईनची दिल्ली ते मुंबई आणि श्रीनगर ते मुंबई ही दोन विमाने सुरतला वळवण्यात आली आहेत.

Go First Crisis
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 3, 2023, 7:59 AM IST

सूरत : मुंबईला जाणारी गो फर्स्ट या विमानसेवेची दोन विमाने सुरतला वळवण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गो फर्स्टची श्रीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई या दोन विमानांना मुंबईत न नेता ते सुरतला वळवण्यात आले. याबाबत कंपनीच्या वतीने प्रवाशांना कोणतेही कारण दिले नाही. दुसरीकडे सूरतला वळवण्यात आलेल्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासाची कोणतीही सोय विमान कंपनीने न केल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी डीजीसीएने विमान कंपनीला नोटीस जारी केली आहे.

सूरत विमानतळावर लँडींगचे कारण गुलदस्त्यात : गो फर्स्टच्या श्रीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई या दोन विमानांचे सूरत विमानतळावर लँडींग करण्यात आले. त्यामुळे या विमानातील प्रवाशी ताटकळत बसले आहेत. दिल्ली ते मुंबई आणि श्रीनगर ते मुंबई या दोन विमानांना सूरतकडे वळवण्यात आली होती. आता मात्र ही दोन विमाने सूरतवरुन निघाल्याची माहिती सूरत विमानतळाचे संचालक रूपेश कुमार यांनी दिली. मात्र सुरत विमानतळावर लँडींग का करण्यात आले, याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही.

दोन गो फर्स्ट विमाने वळवली : श्रीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई या दोन विमानांना मंगळवारी संध्याकाळी 6:30 ते 7 च्या दरम्यान सूरत विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व प्रवासी अजूनही विमानात आहेत. लँडिंगचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सूरत विमानतळाचे संचालक रुपेश कुमार यांनी सांगितले आहे.

चार तासापेक्षा जास्त काळ ताटकळले प्रवाशी : दिल्ली ते मुंबई आणि श्रीनगर ते मुंबई या दोन विमानांना सूरत विमानतळावर वळवण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. हे प्रवाशी चार तासांपेक्षाही जास्त काळ विमानतळावर अडकले. आम्हाला चार तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहत ठेवण्यात आले. आमची सर्व योजना थांबवण्यात आली आहे. आम्हाला येथे थांबणे खूप अवघड आहे, असे श्रीनगरहून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने यावेळी सांगितले.

दोन दिवस विमानसेवा राहील बंद : गो फर्स्ट एअरलाइन्सने मंगळवारी त्यांचे फ्लाइट ऑपरेशन 3 मे ते 5 मे पर्यंत रद्द राहतील असे जाहीर केले आहे. प्रवाशांना त्यांचा संपूर्ण परतावा जारी केला जाईल. गो फर्स्ट एअरलाइन्सच्या अधिकृत मीडिया खात्याने ट्विटरवर "ऑपरेशनल कारणांमुळे, 3, 4 आणि 5 मे 2023 च्या GoFirst फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. आम्ही आमच्या विश्वासू ग्राहकांची मनापासून माफी मागतो. लवकरच आम्ही परत येऊ असे आश्वासन देतो. मूळ पेमेंटनुसार संपूर्ण परतावा प्रवाशांना जारी केला जाईल, असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न : भारत सरकार गो फर्स्ट एअरलाइन्सला शक्य तितक्या प्रकारे मदत करत आहे. परंतु प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करणे एअरलाइनचे कर्तव्य आहे. प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, अशी अपेक्षा असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. या अडथळ्यामुळे एअरलाइनच्या आर्थिक स्थितीला मोठा धक्का बसला आहे. एअरलाइनने एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहणे योग्य असल्याचेही सिंधिया यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या प्रकरणी डीजीसीएने गो फर्स्ट एअरलाईन्सला नोटीस बजावली आहे.

हेही वाचा - Modis Security Army Helicopter Stuck : रायचूरमधील हेलिपॅडवर पंतप्रधानांचे सुरक्षा हेलिकॉप्टर अडकले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.