ETV Bharat / bharat

Mumbai Goa Vande Bharat Express : मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा कंदील, उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहेत. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून पाच वंदे भारतला सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे.

Patna Ranchi Vande Bharat Express
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 27, 2023, 10:19 AM IST

Updated : Jun 27, 2023, 11:41 AM IST

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेससह देशभरातील पाच वंदे भारत ट्रेनला भोपाळ येथील राणी कमलापती स्थानकांवरून हिरवा झेंडा दाखवला आहे. या पाच गाड्यांमध्ये भोपाळ येथील राणी कमलपती राणी ते इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, दुसरी गाडी भोपाळ ते जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड ते बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, रांची ते पटणा वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

बालासोर अपघातामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द : मुंबई गोवा वंदे भारत ही बहुप्रतिक्षीत रेल्वे गाडी 3 जूनपासून सुरु होणार होती. मडगाव रेल्वे स्थानकातून लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र 2 जूनला ओडीशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारापेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले. या अपघातानंतर वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. मात्र, आता मंगळावरी गोवा मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, राणी कमलापती (भोपाळ)-इंदौर वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, रांची-पटणा वंदे भारत एक्सप्रेस आणि धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.

Mumbai Goa Vande Bharat Express
वंदे भारत एक्स्प्रेस

तीन ते चार तासांचा वेळ वाचणार : आता सध्याच्या गाड्यांना गोव्यातील मडगाव स्थानकापासून ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे सुमारे 586 किलोमिटर अंतर कापण्यासाठी साधारण 11 ते 12 तास इतका वेळ लागतो. तेच अंतर या ट्रेनने अवघ्या 8 तासात प्रवाशांना कापता येणार असल्याने प्रवाशांचा साधारण 3 ते 4 तासांचा वेळ वाचणार आहे. कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाले असून या अंतर्गत सर्वच रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. या शिवाय पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरडी कोसळण्याचा घटना सुरु असते. या शिवाय दृष्यमानताही कमी होते. अशा परिस्थितीत वंदे भारत या सेमी स्पीड रेल्वेगाडीला मर्यादा येणार आहे.

Mumbai Goa Vande Bharat Express
वंदे भारत एक्स्प्रेस सुविधा

मुंबई- गोवा 'वंदे भारत'चे वैशिष्टे

  • एकूण आठ डब्ब्याची गाडी असणार
  • आठवड्यातून सहा दिवस धावणार
  • शुक्रवारी गाडी प्रवाशांच्या सेवेत नसेल.
  • वेग क्षमता- १६० किलोमीटर प्रति तास
  • मान्सून वेळापत्रकामुळे वेगावर मर्यादा
  • प्रत्यक्षातील वेग ८० किलोमीटर प्रति तासच्या आतमध्ये
  • तिकिटीच्या किंमतीत नाष्टा,जेवण
  • मडगाव ते सीएसएमटी प्रवास ७ तासात पूर्ण करणार
Mumbai Goa Vande Bharat Express
वंदे भारत एक्स्प्रेस वैशिष्टे

अशा असणार सुविधा

  • संपूर्ण डबे वातानुकिलत असणार
  • जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल माहिती प्रणाली
  • स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे
  • अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
  • प्रत्येक डब्यात इमरजेंसी पुश बट
  • वैक्युम आधारित टायलेट
  • १८० डिग्री फिरणारी आसने

अंदाचित तिकीट दर

  • चेअर कार- १५८० रुपये
  • एक्झिक्युटीव चेअर कार- २८७० रुपये

'वंदे भारत'चे थांबे

  • सीएसएमटी सुरु होणार
  • दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली,थिविम
  • मडगाव शेवटचे सुरुवात

या पाच 'वंदे भारत'चे लोकार्पण

  • १.मुंबई-गोवा
  • २.बंगलुरु-हुबली
  • ३. पटना-रांची
  • ४.भोपाळ -इंदूर
  • ५. भोपाळ-जबलपूर

पाटणा रांची वंदे भारतमधील जागांची संख्या : आठ डबे असलेल्या पाटणा रांची वंदे भारत एक्स्प्रेसचे आरक्षणाचे काम शनिवारपासून सुरू झाले. या ट्रेनमध्ये AC चेअर कारसाठी 423 जागा आहेत, तर EC चेअर कारसाठी 40 जागा आहेत. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ट्रेनमध्ये सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेसचे किती असेल भाडे : पाटणा रांची वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे केवळ 20 किलोमीटरसाठी 690 रुपये ठेवण्यात आले आहे. रांची ते मेसरा हे अंतर फक्त 20 किमी आहे. EC चेअर कारचे भाडे 690 रुपये आहे, तर AC ​​चेअर कारचे भाडे 365 रुपये आहे. दुसरीकडे पाटणा ते रांचीचे संपूर्ण भाडे पाहता, ईसी चेअर कारचे भाडे 1930 रुपये आणि चेअर कारचे भाडे 1025 रुपये ठेवण्यात आले आहे. रांची ते पाटणा दरम्यान EC चेअर कारसाठी 2110 रुपये आणि चेअर कारसाठी 1175 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय CC साठी 137 रुपये आणि EC साठी 170 रुपये कॅटरिंग शुल्क असून ते ऐच्छिक असेल. यामध्ये सकाळी चहा, नाश्ता आणि पाणी मिळणार असून यासोबत जवणासाठी वेगळे शुल्क आकरले जाणार आहे.

चहा नाश्त्याची सोय : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चहा नाश्त्याव्यतिरिक्त रात्रीच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना सीसीसाठी 288 रुपये आणि ईसीसाठी 349 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. यामध्ये चहा-नाश्त्याशिवाय रात्रीचे जेवण आणि पाण्याचा समावेश असणार आहे.

हेही वाचा -

  1. Vande Bharat Train : नरेंद्र मोदींच्या हस्ते 'या' 5 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन, जाणून घ्या
  2. PM Inaugration Vande Bharat : चेन्नई-कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
  3. Vande Bharat Express: मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण काही तासांवर; रेल्वे कर्मचारी देत आहेत फायनल टच

Last Updated : Jun 27, 2023, 11:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.