ETV Bharat / bharat

हनिमून टूर पॅकेजमध्ये निघाले चरस; नवविवाहित जोडपे थेट कतारच्या तुरुंगात! - ओनिबा कौसर

एक मुंबईतील नवविवाहित जोडपं हनिमूनसाठी कतारला गेले होते. मात्र, या हनिमूनने त्यांचे अख्खं आयुष्य बदलून टाकलं. कतार विमानतळावर तपासणीत या दाम्पत्याजवळील बॅगमध्ये 4 किलो अमली पदार्थ आढळल्याने दोघांनाही अटक झाली. या गुन्ह्यात दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी जोडप्यांच्या कुटुबीयांकडून तक्रार दाखल झाल्यानंतर एनसीबीने चौकशी करून दोघांची सुटका केली आहे. या जोडप्याने दोन वर्ष तरुंगात घालवली आहेत. आज ते मुंबईत परतले.

कतार हनिमून न्यूज
कतार हनिमून न्यूज
author img

By

Published : Apr 14, 2021, 9:54 PM IST

Updated : Apr 14, 2021, 10:59 PM IST

मुंबई - हनिमून म्हणजेच मधूचंद्र. हा वेळ म्हणजे आराम करण्याचा वेळ. लग्नाच्या धावपळीनंतर निवांत काही क्षण आपल्या जोडीदाराबरोबर घालवत आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी हनिमून हवाच असं म्हटलं जातं. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य आपल्या आवडत्या ठिकाणी जातात. असेच एक मुंबईतील नवविवाहित जोडपं हनिमूनसाठी कतारला गेले होते. मात्र, या हनिमूनने त्यांचे अख्खं आयुष्य बदलून टाकलं. कतार विमानतळावर तपासणीत या दाम्पत्याजवळील बॅगमध्ये 4 किलो अमली पदार्थ आढळल्याने दोघांनाही अटक झाली. या गुन्ह्यात दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी जोडप्यांच्या कुटुबीयांकडून तक्रार दाखल झाल्यानंतर एनसीबीने चौकशी करून दोघांची सुटका केली आहे. या जोडप्याने दोन वर्ष तरुंगात घालवली आहेत. आज ते मुंबईत परतले.

मुंबईतील निर्दोष दाम्पत्याला कतारमध्ये सुनावली होती 10 वर्षांची शिक्षा

एनसीबीचे विभागीय संचालक (अतिरिक्त शुल्क), के.पी.एस. मल्होत्रा यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 6 जुलै 2019 रोजी मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कौसर हनीमूनसाठी कतारला गेले होते. दोहाच्या हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये अमली पदार्थ आढळले. तेथील पोलिसांनी अमली पदार्थ ताब्यात घेत त्यांना अटक केली. त्यांच्या बॅगमधून एकूण 4.1 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. त्यांच्यावर कतारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कतारमधील कोर्टाने या दोघांना 10 वर्षाच्या कारवासाची शिक्षा ठोठावली.

mumbai-couple-will-return-home-after-two-years-in-qatar-jail
तुरुंगातच दिला होता बाळाला जन्म

नेमकं काय घडलं?

27 सप्टेंबर रोजी ओनिबा कौसरचे वडील शकील अहमद कुरेशी यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे (एनसीबी) तक्रार दाखल केली. आपली मुलगी व जावई निर्दोष असून त्यांना फसवण्यात आले आहे. या मागे नातेवाईक रियाझ कुरेशी आणि निजाम कारा यांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बसुम रियाज कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा या दोघांनी हे हनिमून टूर पॅकेज भेट म्हणून दिले होते. या दोघांनी एका बॅगेत अमली पदार्थ लपवले होते. मात्र, या पॅकेटबद्दल त्यांना विचारले असता, कतारमधील माझ्या मित्राला एक तंबाखू हवी आहे. ती तेवढी तिकडे गेल्यावर दे, असे शकील यांना तब्बसुम हिने सांगितले होते. या संदर्भात तबस्सुम व निजाम कारा या दोघांच्या विरोधात शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि काही ऑडिओ क्लिप्स एनसीबीकडे सुपूर्द केली.

आरोपींचा पर्दाफाश -

एनसीबीच्या चौकशीत निजाम कारा आणि तबब्सुम हे मुंबईत एक ड्रग सिंडिकेट चालवत असल्याचे समोर आले. एनसीबीने 26 फेब्रुवारी 2020 रोजी चंदीगडमधून चार जणांच्या टोळीला अटक केली. या टोळीकडून 1.4 किलो चरस जप्त करण्यात आला. वेदरम, महेश्वर, शाहनवाज आणि शबाना अशी या टोळीतील चार सदस्यांची नावे आहेत. चौकशीदरम्यान सर्व धागेदोरे जोडत एनसीबीला निजाम कारा त्यांची पत्नी शहेदा कारा आणि तब्बसुम रियाज कुरेशी हे आरोपी आढळले. एनसीबीने तीघांना अटक केली. कट रचून शरीक कुरेशी आणि ओनिबा कौसरच्या बॅगमध्ये चरस लपवल्याचे त्यांनी कबूल केले.

अखेर जोडप्याची सूटका -

संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर एनसीबीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आणि कागदपत्रे कतारमधील भारतीय दूतावासाकडे पाठवल्या. कतारच्या भारतीय दूतावासाने पुरावे कतार न्यायालयात सादर केले आणि या जोडप्याची बाजू मांडली. सुनावणीनंतर कतार न्यायालयाने दोघांची सुटका केली. शरीक कुरेशी व पत्नी ओनिबा कुरेशी हे मुंबईत राहणाऱ्या उच्चशिक्षित कुटुंबातील आहेत. जेव्हा ते हनिमूनला गेले होते. तेव्हा ओनिबा 3 महिन्यांची गर्भवती होती. कारगृहातच त्यांना मुलगी झाली होती.

हेही वाचा - हनिमूनला नातेवाइकांच्या पैशावर जाताय? मग एकदा हे वाचाच...

हेही वाचा - ठाण्यातील जोडप्याचा 87 दिवसांचा हनिमून.. लॉकडाऊन सुरू झाल्याने 'पेरु' देशात अडकले होते

हनिमून टूर पॅकेजमध्ये निघाले चरस; नवविवाहित जोडपे थेट कतारच्या तुरुंगात!

Last Updated : Apr 14, 2021, 10:59 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.