अहमदाबाद/साबरमती(गुजरात) - भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई धावणार आहे. त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये बुलेट ट्रेनचा विस्तार केला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादमधील साबरमती येथे स्टेशन बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात येत आहे. हे स्टेशन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. हे स्टेशन नऊ मजली असेल आणि 1.36 लाख स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले हे स्टेशन असणार आहे. सध्या या स्टेशनची बॉडी बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ट्रकचे सपाटीकरण करण्याचे कामही येथे सुरू आहे. दांडी यात्रेच्या थीमवर साबरमती स्टेशन तयार करण्यात येणार आहे.
साबरमती नदीवरील पुलाचे काम - 508 किमी लांबीच्या मार्गावर एकूण 21 किमीचे बोगदे हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी जाणार असून अनेक नद्यांवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. यासोबतच बिक्सी स्टेशन ते शीळफाटा स्टेशन दरम्यान सुमारे 21 किमी लांबीचा बोगदा बांधण्यात आला आहे. याशिवाय नर्मदा, तापी, मही, साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पूल बांधण्याचे कामही सुरू आहे. साबरमती नदीवर पिलर टाकून त्यावर बॉडी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
अहमदाबाद जिल्ह्यात जमीन भूसंपादन पूर्ण - हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी अहमदाबाद जिल्ह्यात एकूण 2,70,000 चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली आहे. ज्यामध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई, साबरमती, वटवा आणि असरवा तालुक्यातून जमीन संपादित करण्यात आली आहे. या भूधारकांना रेल्वे विभागाने एकूण ११०८.४५ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. ज्यामध्ये गुजरातमध्ये एकूण 954.28 हेक्टर आणि महाराष्ट्रात 942.71 हेक्टर जमीन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे.
कसे असेल साबरमती स्टेशन - 1.36 लाख स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या स्टेशनच्या प्रत्येक मजल्यावर तुम्हाला हाय-फाय रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स पाहायला मिळतील. या स्थानकाची संपूर्ण रूपरेषा समोर आली आहे. ही इमारत भारतातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे मार्गाचे उत्तर टर्मिनल म्हणून काम करेल. आलिशान हॉटेलमध्ये जेवणापासून ते निवासापर्यंत सर्व सुविधा या स्थानकावर उपलब्ध असतील. ही नऊ मजली इमारत दोन ब्लॉकमध्ये पसरली आहे. यात आगामी अहमदाबाद मेट्रो फेज-I च्या रेल्वे स्टेशन, BRT बस स्थानक आणि AEC मेट्रो स्टेशनला मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी असेल.
दांडी यात्रेच्या धीमवर स्टेशन - नऊ मजली असलेल्या या स्थानकाच्या पहिल्या तीन मजल्यांमध्ये पार्किंगची व्यवस्था असेल. येथे एकाच वेळी १२०० वाहने उभी करता येतील एवढी जागा असेल. याशिवाय फूड कोर्ट, दुकाने आदींसाठी ३१.५०० चौरस मीटर क्षेत्रफळ ठेवण्यात आले आहे. या स्थानकाच्या इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावर एकूण 60 खोल्यांची हॉटेल्स असतील. लहान मुलांना खेळण्यासाठी जागाही असेल आणि रेस्टॉरंटही असेल. साबरमती स्थानकाच्या सातव्या आणि चौथ्या मजल्यावर टेरेस गार्डनही बांधले जाणार आहेत. दांडी यात्रेच्या थीमवर साबरमती स्टेशन तयार करण्यात येणार आहे. या स्टेशनची प्रतिकृती चरख्यासारखी असणा्र आहे.
स्टेशन इमारतीवर भूकंपाचा परिणार होणार नाही - बुलेट ट्रेन स्टेशनची इमारत अतिशय मजबूत करण्यात येणार आहे. ही इमारत अशी असेल की त्यावर भूकंपाचाही परिणाम होणार नाही. या इमारतीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याचीही संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे विजेसाठी सोलर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे वीज खंडित होणार नाही. या इमारतीमुळे सौरऊर्जा वाढणार आहे. इमारतीच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिशय सुविधांनी सुसज्ज् असे हे बुलेट ट्रेनचे स्टेशन असणार आहे.
हेही वाचा - Bullet Train Vadodara Station : बडोदामध्ये बुलेट ट्रेनचा स्पीड वाढला; नद्यांमध्ये पिलर टाकण्याचे काम पूर्ण