ETV Bharat / bharat

मुलायम सिंह यादवांची सून अपर्णा सिंह भाजपात

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( UP Assembly Election 2022 ) समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव ( SP Supremo Mulayam Singh Yadav ) यांच्या कुटुंबात भाजपने मोठी फूट पाडली आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा सिंह यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश ( Aparna Singh Yadav Likely To Join BJP ) केला आहे.

Aparna Singh Yadav
अपर्णा सिंह यादव
author img

By

Published : Jan 18, 2022, 10:48 PM IST

Updated : Jan 19, 2022, 11:25 AM IST

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( UP Assembly Election 2022 ) राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. एकीकडे योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि डझनभर आमदारांनी राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्याचवेळी आता भारतीय जनता पक्षही पलटवार करत आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातच भाजपने फूट पाडली आहे. यात आता समाजवाडीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव ( SP Supremo Mulayam Singh Yadav ) यांची धाकटी सून अपर्णा सिंह यादव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ( Aparna Singh Yadav Likely To Join BJP ) आहे.

भाजपचे मानले आभार
अपर्णा यादव यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मी भाजपची आभारी आहे असे म्हणत माझ्यासाठी देशाला पहिले प्राधान्य आहेे असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी, योगींच्या कामाचे कौतुक
मुलायम यांची धाकटी सून अपर्णा सिंह यादव या अनेकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्याकडून कायमच भाजपच्या समर्थनार्थ भूमिका घेण्यात आलेल्या आहेत. अपर्णा यादव यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष त्यांना राजधानी लखनऊच्या कँट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते.

Last Updated : Jan 19, 2022, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.