ETV Bharat / bharat

Mukesh Ambani visited Badrinath Dham : उद्योगपती मुकेश अंबानींनी घेतलं बद्री-केदारचं दर्शन; मंदिर समितीला दिलं भरभरून दान

Mukesh Ambani visited Badrinath Dham : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम येथे पोहोचले. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ धाम इथं प्रार्थना केली. यावेळी त्यांनी बद्रीनाथ तसंच केदारनाथ मंदिर समितीला 5 कोटी रुपयांची देणगी दिलीय.

Mukesh Ambani visited Badrinath Dham
Mukesh Ambani visited Badrinath Dham
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 12:55 PM IST

बद्रीनाथ Mukesh Ambani visited Badrinath Dham : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे त्यांच्या देवभक्तीसाठीही ओळखले जातात. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी गणेशोत्सवात भव्य पूजा केली होती. यानंतर आज मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह धार्मिक पर्यटनासाठी उत्तराखंडमध्ये पोहोचले. याठिकाणी त्यांनी सर्वप्रथम बद्रीनाथ धामला जात बद्रीनाथाचे दर्शन घेतले.

बद्री केदार मंदिर समितीला पाच कोटी रुपये दान : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज बद्रीनाथ मंदिरात प्रार्थना केली. यावेळी मुकेश अंबानींसोबत त्यांचं कुटुंबीयही उपस्थित होतं. बद्रीनाथ धामवर पोहोचल्यावर मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पनवार यांनी मुकेश अंबानी यांचं जोरदार स्वागत केलं. भगवान बद्री विशालचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीला 5 कोटी रुपयांची देणगी दिलीय. मुकेश अंबानी यांनी बद्री केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांना 5 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय.

बद्रीनाथहून केदारनाथला पोहोचले मुकेश अंबानी : बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी केदारनाथ धामला पोहोचले. याठिकाणी मुकेश अंबानी यांनी बाबा केदारच्या धाममध्ये प्रार्थना केली. यावेळी केदारनाथ धाममध्ये देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाहून तिथं आलेल्या भाविकांना आनंद झाला. तिथं उपस्थित असलेल्या लोकांना मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची एक झलक पाहायची होती.

सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले होते 25 कोटी रुपये : यापूर्वी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडनंही मुख्यमंत्री सहायता निधीला 25 कोटी रुपये दिले होते. वास्तविक, गेल्या महिन्यात 8 सप्टेंबरला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी सहाय्यक तनय द्विवेदी डेहराडूनला आले होते. त्यावेळी 25 कोटी रुपयांचा धनादेश मुकेश अंबानी यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे सल्लागार बी. डी. सिंह यांना सुपूर्द केला होता. तेव्हा उत्तराखंड पाऊस, पूर आणि भूस्खलनच्या आपत्तींचा सामना करत होता.

क्रिकेटपटू सुरेश रैनाही केदारनाथच्या दरबारी : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यानंही बद्रीनाथ आणि केदारनाथ धामला बुधवारी भेट दिली होती. सुरेश रैनानं आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी दोन्ही धामांमध्ये प्रार्थना केली होती. सुरेश रैनाच्या आधी भारताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतही बद्रीनाथ केदारनाथच्या दर्शनासाठी आला होता.

हेही वाचा :

  1. Nita Ambani hugs SRK : नीता अंबांनीने मारली शाहरुख खानला मिठी, अँटिलियातील गणेश उत्सवात सेलेब्रिटींची मांदियाळी
  2. Jio Air Fiber on Ganesh Chaturthi : 'जिओ एअर फायबर'चं गणेश चतुर्थीला लाँचिंग - मुकेश अंबानींची घोषणा
  3. UP Global Investors Summit: उत्तरप्रदेशात अब्जावधींची गुंतवणूक, मुकेश अंबानी देणार एक लाख नोकऱ्या, पंतप्रधान मोदी म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.