ETV Bharat / bharat

Asia's Richest Man : मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानींना टाकले मागे

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा फटका बसला आहे. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी $100 बिलियनपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले. असे करणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सनुसार, अंबानींचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे.

Asia's Richest Man
मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
author img

By

Published : Apr 5, 2023, 10:29 AM IST

नवी दिल्ली : आशियातील मुकेश अंबानी पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 'फोर्ब्स'ने मंगळवारी एक यादी जारी केली आहे. ही 2023 च्या अब्जाधीशांची यादी आहे. जागतिक यादीत अंबानींचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी 24व्या स्थानी घसरले आहेत. याआधी अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर होती. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली.

अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये 9व्या क्रमांकावर : फोर्ब्सने म्हटले आहे की, अदानी यांची एकूण संपत्ती आता 47.2 अब्ज डॉलर्स आहे आणि ते अंबानीनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. अंबानीकडे हे 83.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्री जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. रिलायन्स इंडस्ट्रीने 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसे कमवले. त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे.

शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर : फोर्ब्सच्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती $2,100 अब्ज आहे. 2022 मध्ये हा आकडा जास्त होता तो म्हणजेच $2,300 अब्ज होता. फोर्ब्सच्या यादीनुसार भारतातील शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. देशातील चौथ्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान सायरस पूनावाला यांना मिळाले आहे. स्टील बॅरन लक्ष्मी मित्तल पाचव्या क्रमांकावर, ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि आठव्या स्थानावर डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आहेत.

अदानी प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची मागणी : चौकशीच्या मागणीसाठी विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे अधिवेशन चालू झाल्यापासून सभागृहाचे कामकाज होऊ शकलेले नाही.हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या अहवालानंतर अदानी समुह चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अहवालानंतर समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती.

हेही वाचा : UPI Outage Impacts On SBI : एसबीआयला यूपीआय, नेटबँकींगचा फटका; सेवा विस्कळीत झाल्याचा ग्राहकांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.