मुंबई 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर प्रत्येकजण 5G सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहे. कंपन्यांनी लवकरच 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. रिलायन्स जिओने जगातील सर्वात वेगवान 5G रोल आउट योजना तयार केली आहे. दिवाळी 2022 पर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरांसह 5G Jio Service अनेक प्रमुख शहरांमध्ये Jio 5G लाँच होणार. डिसेंबर 2023 पर्यंत, भारतातील प्रत्येक शहर, तालुका आणि तहसीलमध्ये Jio 5G पोहोचवू, अशी माहिती जिओचे मुकेश अंबानी यांनी दिली आहे.
एअरटेल जिओत स्पर्धा जिओने प्रवेश केल्यानंतर भारतीय दूरसंचार उद्योग indian telecommunication industry खूप बदलला आहे. केवळ 4G नेटवर्क असूनही कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. आता 5G युग आहे आणि जिओला एअरटेलशी स्पर्धा करावी लागणार आहे. एअरटेलने Airtel देखील स्पष्ट केले आहे की ते चालू महिन्यातचं म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये 5G सेवा सुरू करणार आहेत. या प्रकरणात, भारतातील दूरसंचार उद्योगातील सर्वात मोठी कंपनी जिओ. त्यामुळे जिओ 5G सेवेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.
सगळ्यात स्वस्त डेटा मुकेश अंबानी यांनी सांगितले की रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरात सेवा देणार आहे. देशातील सगळ्यात स्वस्त 5G इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स जिओसोबत 100 मिलियन घरांना जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
हेही वाचा No Twitter Shopping ट्विटरद्वारे खरेदी करताना घ्या काळजी, नाही तर होऊ शकते फसवणूक