ETV Bharat / bharat

Muharram Procession In JK : तब्बल तीन दशकानंतर श्रीनगरमध्ये मोहरमची मिरवणूक काढण्याला परवानगी

author img

By

Published : Jul 27, 2023, 10:19 AM IST

तब्बल तीन दशकानंतर श्रीनगर शहरात मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ६ ते ८ या वेळेत दोन तास पारंपरिक मार्गावर मिरवणुकीला परवानगी दिली जाईल, अशी माहिती श्रीनगरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी दिली आहे.

Muharram Procession In JK
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : शहरात मोहरमची मिरवणूक काढण्यासाठी जम्मू कश्मीर प्रशासनाने परवानगी दिली आहे. तब्बल तीन दशकानंतर शहरात मोहरमची मिरवणूक काढण्यासाठी परवानगी दिल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आनंद पसरला आहे. मोहरमची मिरवणूक श्रीनगर शहरातून गुरुबाजार ते डलगेटपर्यंत काढण्यात येणार आहे. तब्बल तीन दशकानंतर मोहरमची मिरवणूक शहरातून काढण्यासाठी प्रशासनाने दोन तासाचा कालावधी दिला आहे. ही मिरवणूक शांततेत पार पडेल अशी माहिती विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी दिली आहे.

सकाळी 6 ते 8 या वेळेत मिरवणुकीला परवानगी : प्रशासनाने तीन दशकानंतर शहरातील गुरुबाजार ते डलगेटपर्यंत मोहरम मिरवणुकीला परवानगी दिली. श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून डेक्सची साफसफाई करण्यात आली. श्रीनगरमधील पारंपरिक मार्गावर सकाळी 6 ते 8 या दोन तासाच्या वेळेत मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. परिस्थिती विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्रीनगरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी दिली आहे.

शहीद गंज येथून सुरू होईल मिरवणूक : मोहरमची पारंपरिक मिरवणूक शहीद गंज येथून सुरू होणार असून या मिरवणुकीचा डलगेट येथे समारोप होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेमुळे 1989 पासून मोहरमच्या पारंपरिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली होती. दीर्घकाळापासून मोहरमची मिरवणूक निघाली नाही. गुरुबाजार ते डलगेट या मोहरमच्या पारंपरिक मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी आमच्या शिया बांधवांची प्रलंबित मागणी आहे. गेल्या 32-33 वर्षांपासून या मिरवणुकीला परवानगी नव्हती. आता प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचेही विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले आहे.

काश्मिरी जनतेमुळे ऐतिहासिक निर्णय घेण्यास मदत : मोहरमचा कार्यक्रम शांततेत पार पडल्यास प्रशासनाला इतर मुद्द्यांवरही असेच निर्णय घेण्यास मदत होणार असल्याचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी स्पष्ट केले. या आडून कोणी उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विजय कुमार बिधुरी यांनी दिला. काश्मीरमधील जनतेने शांततेचे वातावरण निर्माण केल्यामुळे प्रशासनाला हा ऐतिहासिक निर्णय घेण्यास मदत झाल्याचेही विजय कुमार बिधुरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाला निर्णय घेणे सोपे झाले : काश्मिरी जनतेने शांततेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घेणे सोपे झाल्याचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले. उद्या कामाचा दिवस असल्याने आम्हाला अडचण आली. त्यामुळे आम्ही वेळेवर मर्यादा घातल्या आहेत. मिरवणूक सकाळी 6.00 ते सकाळी 8.00 पर्यंत काढण्यात येणार आहे, त्यामुळे इतरांचीही गैरसोय होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मिरवणुकीसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मिरवणूक मार्गावर रुग्णवाहिका स्टँडबायवर असतील, पाणी उपलब्ध असेल आणि शोक करणार्‍यांसाठी डलगेट येथे बस उभ्या राहणार आहेत. ही मिरवणूक शांततेत पार पडेल, अशी आम्हाला आशा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.