ETV Bharat / bharat

जगातील सर्वात श्रीमंत यूट्यूबरचा 'एक्स'वर पहिला व्हिडिओ अपलोड, एलॉन मस्क यूट्यूबला देणार टक्कर? - Elon Musk

Mr. Beast puts the first video on X : प्रसिद्ध यूट्यूबर डोनाल्डसन उर्फ मिस्टर बीस्ट यांनी एक्सवर (पूर्वीचे Twitter) पहिला व्हिडिओ अपलोड केला आहे. तसंच काही तासांमध्येच या व्हिडिओला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यानंतर खूश होऊन एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी मिस्टर बीस्टची पोस्ट रीशेअर केली आहे.

bye bye youtube hello x Mr beast puts his first video on x
बाय बाय यूट्यूब, हॅलो एक्स? मिस्टर बीस्टने 'एक्स'वर पहिला व्हिडिओ केला अपलोड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 12:34 PM IST

Updated : Jan 16, 2024, 12:47 PM IST

Mr. Beast puts the first video on X : यूट्यूबवर वर्चस्व गाजवलेल्या मिस्टर बीस्ट (MrBeast) यांनी आज सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. यापूर्वी एलॉन मस्क यांना प्रत्युत्तर देताना, डोनाल्डसन उर्फ मिस्टर बीस्ट म्हणाले होते की, “माझ्या व्हिडिओंना बनवण्यासाठी लाखो खर्च येतो. जरी त्यांना एक्सवर अब्जावधी व्ह्यूज मिळाले असले तरी हवा तेवढा नफा मिळणार नाही." तसंच या प्लॅटफॉर्मची चाचणी घेण्यास मी तयार असल्याचंही ते म्हणाले होते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता एक्सवर आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला आहे. तसंच या व्हिडिओला किती जाहिराती मिळतील हे पुढच्या आठवड्यात शेअर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पोस्टमध्ये काय म्हणालेत मिस्टर बीस्ट : "$1 कार विरुद्ध $100,000,000 कार!!!" असं शीर्षक देत ते म्हणालेत की, “एक्सवरील व्हिडिओ जाहिरातीतून किती कमाई करेल याची मला उत्सुकता आहे. म्हणून मी त्याची चाचणी घेण्यासाठी व्हिडिओ अपलोड करतोय. पुढील आठवड्यात जाहिरात रिव्हेन्यू शेअर करीन." मिस्टर बीस्ट यांनी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही तासांमध्येच या व्हिडिओला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

  • एक्सवर व्हिडिओ अपलोड करणार नाही : काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी मिस्टर बीस्टला मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ अपलोड करण्याचा सल्ला दिला. मात्र, मिस्टर बीस्ट यांनी यासाठी नकार दिला होता. असं असतांनाच आता मिस्टर बीस्ट यांनी एक्सवर व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामुळं अनेकांच्या आश्चर्यानं भुवया उंचावल्या आहेत.

मिस्टर बीस्ट यूट्यूबवर किती पैसे कमवितात? : जाहिराती आणि प्रायोजकत्वांद्वारे मिस्टर बीस्ट यांनी यापूर्वी 2021 मध्ये $54 दशलक्ष कमावले. तसंच त्यांचे यूट्यूबचे उत्पन्न सरासरी $4.5 दशलक्ष प्रति महिना आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार हे उत्पन्न त्यांच्या सेलिब्रिटी 100 यादीतील संभाव्य 40 व्या स्थानापर्यंत पोहोचते. मिस्टर बीस्ट यांन बिली इलिश, अँजेलिना जोली, के-पॉप जुगरनॉट बीटीएससारख्या प्रमुख स्टार्सला मागे टाकले आहे. 2022 मध्ये मिस्टर बीस्टनं रोलिंग स्टोनला दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांच्या व्हिडिओंच्या निर्मितीसाठी साधारणत: दशलक्ष डॉलर्स किंवा त्याहून अधिक खर्च येतो.

हेही वाचा -

  1. Elon Musk Pune Friend : पुणे तिथे काय उणे! पुण्यातील तरुणाची थेट इलॉन मस्कशी मैत्री
  2. सॅम ऑल्टमन यांना सीईओ म्हणून परत बोलावण्याची मागणी, गुंतवणूकदार आणत आहेत दबाव
  3. Elon musk vs zukerburg : इलॉन मस्कने मार्क झुकेरबर्गसोबतच्या केज-फाइटवर विनोद केल्याचे केले कबूल...

Last Updated : Jan 16, 2024, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.