ETV Bharat / bharat

Obscene Act In Temple : तरुणाचे शिवमंदिरात अश्लिल कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच हिंदू संघटनांचे धरणे आंदोलन

मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका शिव मंदिराच्या गर्भगृहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये एक तरुण अश्लील कृत्य करताना दिसत आहे. (Youth did obscene act in Indore Shiva temple) या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता हिंदू संघटनांनी आरोपी तरुणावर कारवाई करण्यासाठी धरणे आंदोलन केले आहे. (Hindu organizations protest in Indore)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 17, 2022, 3:18 PM IST

इंदूर : शहरातील शिवमंदिरात बसून अश्लिल कृत्य करणाऱ्या तरुणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (indore shiva temple video viral). याप्रकरणी आरोपी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आता हिंदू संघटना धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. (Hindu organizations protest in Indore). सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

काय आहे प्रकरण : इंदूरच्या प्रकाश नगर येथील विश्वेश्वर शिव मंदिरात गर्भगृहात बसून एक तरुण अश्‍लील कृत्य करत होता. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत उपोषणाला बसले.

मंदिराचे शुद्धीकरण : बजरंग दलाचे संयोजक तनु शर्मा म्हणतात, "जोपर्यंत पोलिस या प्रकरणातील आरोपींना अटक करणार नाहीत, तोपर्यंत हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्ते मंदिराबाहेर उपोषणाला बसतील". ही घटना समोर आल्यानंतर रहिवासी संघटनेने मंदिराचे शुद्धीकरण केले आहे, तर आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या आधी देखील इंदूरच्या मंदिरांमध्ये असा प्रकार समोर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.