अमृतसर: पाकिस्तानी मुलावर प्रेम करणारी मध्य प्रदेशातील 24 वर्षीय तरुणी ( Madhya Pradesh girl ) सर्व कागदपत्रे आणि पासपोर्टसह पाकिस्तानला जाताना अटारी-वाघा सीमेवर आली तेव्हा सीमेवरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या मुलीला पाहिले. गुरुवारी तिला पकडून नंतर ग्रामीण अमृतसरमधील घरिंडा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
मध्य प्रदेशातील रीवा भागातील रहिवासी असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीची तक्रार दाखल केली होती, फिजा खान तिच्या पासपोर्टसह सर्व कागदपत्रांसह बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार रीवा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. रीवा पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार नोंदवून एलओसी जारी करण्यात आली आहे. घरिंडा पोलिसांनी सांगितले की, मुलीला नारी निकेतन येथे पाठवण्यात आले असून तिला शनिवारी ड्युटी मॅजिस्ट्रेटकडे बोलावण्यात आले आहे.
एसडीएम हरप्रीत सिंह यांनी सांगितले की, ही मुलगी मध्य प्रदेशातील रीवा भागातील असून ती एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. पीडित तरुणी फेसबुकवर पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडली. ती मुलगी घरातून पळून गेली आणि पाकिस्तानला जात असताना अधिकाऱ्यांना ती सापडली.
ड्युटी मॅजिस्ट्रेट म्हणाले, "आम्ही 23 जून रोजी मुलीला भेटलो, ती दिलशाद खान नावाच्या एका पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडली होती. तिला पाकिस्तानला जायचे होते. मध्य प्रदेश पोलिसांनी आता मुलीला ताब्यात घेतले आहे."
हेही वाचा -Mental falls off eighth floor : रूग्णालयाच्या 8व्या मजल्यावरून खाली पडला रुग्ण, प्रकृती चिंताजनक