ग्वाल्हेर (मध्यप्रदेश): मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका खासगी विद्यापीठात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या विधानाने देशात नवा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रपिता यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनोज सिन्हा म्हणाले की, 'गांधीजींकडे कोणतीही पदवी नव्हती. गांधींकडे कायद्याची पदवी होती असा लोकांचा भ्रम आहे'. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा गुरुवारी ग्वाल्हेरमध्ये आले होते आणि त्यांनी एका खाजगी विद्यापीठात हे वक्तव्य केले आहे.
बापूंच्या पदवीवर प्रश्नचिन्ह: गुरुवारी ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठात डॉ राम मनोहर लोहिया यांच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा मंचावर संबोधित करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल विचारला, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती आणि माझ्याकडे याचे पुरावे आहेत. गांधीजींकडे कायद्याची पदवी होती असा गैरसमज लोकांमध्ये आहे, असे ते म्हणाले.
विधानाचा काँग्रेसकडून समाचार: लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मीडिया प्रभारींनी ट्विट केले आहे की, 'जेव्हापासून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी यांच्या पदवीवर प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून खूप तणाव निर्माण झाला आहे. ग्वाल्हेर शहरामधील एका कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, महात्मा गांधींकडे कोणतीही पदवी नव्हती. महात्मा गांधी हे अधिकृत वकील होते. ते कायद्याची पदवीधारक होते. मनोज सिंह हे महात्मा गांधींबाबत असे का वागत आहेत, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल असलेले मनोज सिन्हा हे यापूर्वीही अनेकदा वादात राहिलेले आहेत. त्यांच्याबाबत वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही.
हेही वाचा: शिक्षा झाल्यानंतर अनेक दिग्गजांची गेली आहे खासदारकी, पहा कोण आहेत ते नेते