ETV Bharat / bharat

Bhopal Trilok Bor : 100 वर्षे जुने दुर्मिळ बोरांचे झाड, बोरांची किंमत ऐकून व्हाल थक्क! - भोपाळमधील त्रिलोक बोर

माणसाचं झाडं आणि वनस्पतींशी खूप खास नातं आहे. झाडाचे महत्त्व पाहून भोपाळच्या वीटखेडी येथे असलेल्या दुर्मीळ त्रिलोक बोर वृक्षाचे जतन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हे झाड 100 वर्षांहून अधिक जुने असून ते अजूनही फळ देत आहे.

Bhopal Trilok Bor
त्रिलोक बोर
author img

By

Published : Feb 4, 2023, 1:07 PM IST

दुर्मिळ बोरांचे झाड

भोपाळ : भोपाळमधील वीटखेडी येथे 'त्रिलोक बोर' या दुर्मीळ प्रजातीच्या बोराच्या झाडाचे जतन केले जात आहे. हे झाड 100 वर्षांहून अधिक जुने असल्याचा दावा केंद्र सरकार करत असून, देशात या बोराची फक्त 5 झाडे आहेत. विशेष म्हणजे 100 वर्षांनंतरही हे झाड फळ देत आहे. त्या सर्व झाडांचे संगोपन संशोधन केंद्रात केले जात आहे. या त्रिलोक बोराला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. त्यामुळे बोराची किंमतही जास्त आहे. एका बोराची किंमत 20 ते 25 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रजातीच्या बोराला देशभरात मागणी : या वृक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन संशोधन केंद्राने भोपाळच्या वीटखेडी येथे असलेल्या दुर्मीळ त्रिलोक बोरांच्या झाडांचे जतन करण्याचे आदेश दिले आहेत. हे झाड 100 वर्षांहून अधिक जुने असून ते अजूनही फळ देत आहे. या जातीच्या बोराला देशभरातून मागणी आहे. फ्रूट रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांच्या मते, या फळाचा लगदा चिकट नसतो. तो सफरचंदासारखा कापता येतो. या बोराचे वजन सुमारे 40 ते 50 ग्रॅम असते आणि एका झाडाला एका वेळी 2.5 क्विंटल (250 किलो) फळे येतात.

म्हणून नाव 'त्रिलोक बोर' : संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाने सांगितले की, भारतात बोराच्या 125 जाती आहेत. सुमारे 100 वर्षांपूर्वी भोपाळच्या जगदीशपूर (इस्लामनगर) येथील मंदिरात त्रिलोक बोराचे झाड लावण्यात आले होते. या झाडाला फुलेही येत असत. नंतर या झाडावर संशोधन झाले. हे झाड मंदिरात असल्यामुळे तेथील लोकांनी ब्रह्मा, विष्णू, महेश (त्रिदेव) यांचा प्रसाद मानून त्याचे नाव 'त्रिलोक' बोर ठेवले. तेव्हापासून ते त्रिलोक बोर म्हणून ओळखले जाते.

त्रिलोक बोर रोगांवर फायदेशीर : बोराच्या या जातीबद्दल शास्त्रज्ञ सांगतात की, या झाडाचे फळ आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. यामुळे डिप्रेशनची समस्या दूर होते. याशिवाय इतर आजारांवरही हे गुणकारी आहे. त्रिलोक बोरमध्ये फायबर जास्त असते, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. भोपाळच्या हवामानामुळे हे झाड येथे आढळते. मात्र सतत झाडे तोडल्यामुळे बोरांच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता त्रिलोक बोरांचे जतन केले जात आहे. हे फळ सामान्य वातावरणात 12 दिवसांपर्यंत साठवले जाऊ शकते. हे फळ बराच काळ ताजे राहत असल्याने असल्याने याची देशासह परदेशातही निर्यात करता येते.

हेही वाचा : Groom On JCB Machine : वराची लग्नमंडपात जेसीबीतून एंट्री! पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.