ETV Bharat / bharat

सावत्र आई बनली वैरीणी, जेवायला मागितले म्हणून 6 वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगात टाकले उकळते तेल - मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये उकळते तेल ओतले

उत्तर प्रदेशात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका सावत्र आईने जेवायला मागिलेल्या मुलीच्या गुप्तांगावर चक्क उकळते तेल टाकल्याची धक्कादायक घटना घडली ( Mother burns daughter private part in lucknow ) आहे.

Mother burns daughter private part in lucknow
सावत्र आई बनली राक्षस
author img

By

Published : Jul 14, 2022, 7:54 PM IST

लखनऊ ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या राजधानीतील ठाकूरगंज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शांतीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये उकळते तेल ओतले ( Mother burns daughter private part in lucknow ) आहे. यामुळे निष्पाप मुलगी गंभीररित्या भाजली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाकूरगंजच्या निरीक्षकांनी सांगितले की, आरोपी महिलेला अटक केली आहे.

लखनऊच्या कॅम्पबेल रोड येथे खस्ता दुकान सुरू करणाऱ्या तिच्या वडिलाने सांगितले की, त्यांना मूलबाळ नाही. यामुळे 7 फेब्रुवारी 2022 रोजी राणी (नाव बदललेले) या 6 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. 8 जुलै रोजी ते दुकानात असताना त्यांची मुलगी भाजल्याचे त्यांना समजले. घरी जाताना बायकोने सांगितले की चुकून चहा तिच्यावर पडला. मुलीने वडिलांना सांगितले की, आईने कढईत उकळत असलेले तेल चिमट्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले होते. वडिलांनी सांगितले की, ही बाब समोर येताच त्याची पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली.

खायला मागितल्यावर उकळते तेल टाकले - पीडित मुलीचे काकांनी सांगितले की, आपल्या मेहुणीची दत्तक मुलगी भजल्याची माहिती मिळताच ते घरी पोहोचले, तेथे तिच्या वडिलांनी अपघाताबाबत सांगितले. एवढेच नाही तर पीडित मुलीने दत्तक घेतल्यापासून तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबतही सांगितले. काकाच्या म्हणण्यानुसार, राणीने सांगितले की, गेल्या 5 महिन्यांपासून त्याची आई पूनम तिला विनाकारण मारहाण करत होती. एवढेच नाही तर जेवण मागितल्यावर आईने त्याच्या गुप्तांगावर गरम तेल टाकले.

आईला अटक - ठाकूरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी हरिश्चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तिच्या वडिलांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती. ज्यामध्ये त्याने पत्नीवर दत्तक मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तेल ओतल्याचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, पीडित मुलीची मेडिकल करण्यात आली आहे. तर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Gang Raped On Wife : धक्कादायक : पतीने मित्रांसह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.