चिक्कमगलुरू ( कर्नाटक ) : चिक्कमगलुरू तालुक्यातील हगलाखान इस्टेटमध्ये आपल्या मुलाच्या पब जीच्या वेडेपणामुळे आईची हत्या झाल्याची घटना ( Mother died because son Pub G Game ) घडली. मैमुना (40) असे मृत आईचे नाव आहे.
वडिलांशी झाले भांडण : पब्जी खेळणार्या मुलाशी वडिलांचे भांडण झाले होते. मुलानेही वडिलांना उलट बोलत वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात तुला मारून टाकू, असे म्हणत वडिलांनी मुलावरच बंदूक रोखली होती. पती आपल्या मुलाला मारून टाकेल, या भीतीने आई बंदुकीसमोर आडवी आली. दारूच्या नशेत वडिलांनी गोळी झाडली. त्यात 40 वर्षीय मैमुना यांचा मृत्यू झाला आहे.
पतीला अटक : तिचा पती इम्तियास याला पोलिसांनी अटक केली आणि मैमुनाचा मृत्यू झाला असला तरी तिच्या मोठ्या मुलाने तिला तातडीने रुग्णालयात नेले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : PUBG Addiction : पब-जी गेमचे वेड असलेल्या बारावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या