नवी दिल्ली : Mother Dairy Price Hike: मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने फुल क्रीम दुधात 1 रुपये प्रति लिटर आणि टोकन मिल्कमध्ये 2 रुपयांनी वाढ केली आहे. Milk Prices Hikes in Delhi NCR
मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'फुल क्रीम दुधाची किंमत 63 रुपये प्रति लिटरवरून 64 रुपये प्रति लीटर झाली आहे. टोकन दुधाचे दर प्रतिलिटर 48 रुपयांवरून 50 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तथापि, फुल क्रीम दुधाच्या 500 मिली पॅकच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारपासून नवीन दर लागू होतील.
-
The price of full cream milk has increased from Rs 63 per litre to Rs 64 per litre; the price of token milk increased from Rs 48 per litre to Rs 50 per litre. No revision in price of 500ml packs of full cream milk: Spokesperson, Mother Dairy pic.twitter.com/NcLBLNVyUz
— ANI (@ANI) November 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The price of full cream milk has increased from Rs 63 per litre to Rs 64 per litre; the price of token milk increased from Rs 48 per litre to Rs 50 per litre. No revision in price of 500ml packs of full cream milk: Spokesperson, Mother Dairy pic.twitter.com/NcLBLNVyUz
— ANI (@ANI) November 20, 2022The price of full cream milk has increased from Rs 63 per litre to Rs 64 per litre; the price of token milk increased from Rs 48 per litre to Rs 50 per litre. No revision in price of 500ml packs of full cream milk: Spokesperson, Mother Dairy pic.twitter.com/NcLBLNVyUz
— ANI (@ANI) November 20, 2022
यापूर्वी मदर डेअरीने गेल्या महिन्यात दुधाचे दर वाढवले होते. त्यानंतर कंपनीने फुल क्रीम दूध आणि गायीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली होती. या किमती 16 ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. त्याचवेळी अमूलनेही दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती.
या वर्षी चौथ्यांदा किमती वाढल्या: मदर डेअरीचे म्हणणे आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कंपनीने किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहसा असे व्हायचे की इतर कंपन्या भाव वाढवायची, मग मदर डेअरीही दर वाढवायची. मात्र यावेळी मदर डेअरीनेच दर वाढवले आहेत. आता इतर कंपन्याही त्यांच्या किमती वाढवू शकतात, अशी अपेक्षा आहे. मदर डेअरीने यंदा चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.