सुलतानपूर (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यातील बलदीराई पोलीस स्टेशन हद्दीत आठवी पास बनावट डॉक्टरांनी गर्भवती महिलेचे ऑपरेशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे. यामध्ये आई आणि मूल दोघांचा मृत्यू झाला आहे. पीडित कुटुंबानी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची चौकशी केली असता, रुग्णालयातील डॉक्टर आठवी, तर संचालक 5 वी पास असल्याचं निष्पन्न झालं आहे. या दोघांनाकडे आरोग्य विभागची कुठलीही पदवी व पत्र नाही. या दोन्ही झोलर डॉक्टरांना तुरूंगात पाठविण्याची कारवाई केली जात आहे.
दोघांचाही मृत्यू-
संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील बल्देरी पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. पुरवा गावची पूनम नावाची महिला गर्भवती होती. तिला 17 मार्च (मंगळवार) अरवल येथील मां शारदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी पूनमवर ऑपरेशन केलं होतं. पण यावेळी तिला रक्तस्त्राव झाल्यामुळे या दोघांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी दोघांनाही उपचारांसाठी लखनऊला पाठवलं. पण उपचारासाठी जात असताना वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे. झोलर डॉक्टर राजेश लखीमपूर हे खेरी येथील लक्ष्मण नगर येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे नाव कामता लाल साहनी आहे.
तिघांनाही अटक-
पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, मां शारदा हॉस्पिटलचे संचालक, राजेश सहनी 12 वी पास आहेत. रूग्णालयात तैनात असलेला कथित डॉक्टर राजेंद्र प्रसाद शुक्ला केवळ 8 वी पास आहे. तर त्याचा सहकारी केवळ 5 वी पर्यंत शिकला आहे. संचालक राजेश साहनी हे खीरी जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर डॉ. राजेंद्र आणि त्याचा साथीदार शेजारील अयोध्या जिल्ह्यातील आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा- दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच.. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अधिकचा वेळ