ETV Bharat / bharat

50 Snakes In House : अबब! एकाच घरातून बाहेर आले तब्बल 50 विषारी साप!, पहा व्हिडिओ - एका घरात 50 साप

पावसाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे कीटक, कोळी आणि साप बाहेर पडणे हे सामान्य आहे. परंतु जर एका घरातून एवढ्या मोठ्या संख्येने साप बाहेर पडले तर? बिहारच्या रोहतासमध्ये एका जुन्या घरातून एकाचवेळी इतके साप बाहेर आले की त्यांना पाहून वनविभागाच्या टीमलाही धक्का बसला.

50 Snakes In House
एका घरात 50 साप
author img

By

Published : Jul 7, 2023, 5:06 PM IST

Updated : Jul 7, 2023, 5:36 PM IST

पहा व्हिडिओ

रोहतास (बिहार) : बिहारच्या रोहतासमध्ये एका जुन्या घरातून इतके साप बाहेर आले की ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. एकाचवेळी इतके साप पाहून वनविभागाच्या टीमलाही धक्का बसला. रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा येथे एका घरात तब्बल 50 ते 60 साप निघाले आहेत.

दोन डझन सापांना मारले : रोहतास येथील आगेड खुर्द गावातील कृपा नारायण पांडे यांच्या घरातून बुधवारी अचानक एक एक करून अनेक साप बाहेर येऊ लागले. जवळपास अर्धा डझन साप इकडे तिकडे फिरत असल्याचे घरातील लोकांना दिसले. हे पाहून घरात राहणारे लोक घाबरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून या सापांना मारले. मात्र काही वेळाने घरात आणखी साप दिसू लागले. लोकांनी त्यांनाही मारले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन डझन साप मारले. पण तरीही साप बाहेर येणे थांबले नाही. घरातील लोकांनी आणि गावकऱ्यांनी मारूनही जेव्हा साप बाहेर येण्याचे थांबत नव्हते तेव्हा स्थानिक लोकांनीही वनविभाग आणि प्रशासनाला याची माहिती दिली.

जवळपास 30 साप पकडले : माहिती मिळताच जिल्ह्यातील तीन उपविभागातील वनविभागाच्या बचाव पथकाने गुरुवारी गावात पोहोचून सापांचा शोध सुरू केला. सापांना पकडण्यासाठी रेस्क्यू टीमने स्नेक सेव्हर बसवले आणि त्यानंतर जवळपास 30 साप पकडले. सर्पमित्र अमर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही फरशी आणि भिंतीची वीट फोडून सुमारे 30 साप बाहेर काढले आहेत.

भिंत तोडून सुमारे 30 साप बाहेर काढण्यात आले आहेत. सुमारे डझनभर साप जखमी झाले आहेत. उपचारानंतर सर्वांना जंगलात सोडण्यात येईल - सर्पमित्र, अमर गुप्ता

1955 मध्ये बांधले होते घर : घराचे मालक कृपा नारायण पांडे यांनी सांगितले की, त्यांचे हे दोन मजली घर 1955 मध्ये बांधले गेले आहे. यामध्ये ते आपल्या कुटुंबासह राहतात. मात्र आजपर्यंत कधीही अशी घटना घडली नाही. इतके साप पहिल्यांदाच पाहून ते खूप घाबरले आहेत. दुसरीकडे, बचाव पथकाचा भाग असलेले रुपम कुमार यांनी सांगितले की, पकडलेल्या एकूण सापांपैकी सुमारे डझनभर साप जखमी झाले आहेत. उपचारानंतर सर्वांना जंगलात सोडण्यात येईल.

हेही वाचा :

  1. World Crocodile Day : एकापाठोपाठ एक 125 सुसरीची पिल्ले अंड्यातून आली बाहेर! पाहा रोमांचक व्हिडिओ

Last Updated : Jul 7, 2023, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.