रायपूर : प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी सुमारे 2 किमी 6 हजार किलोपेक्षा जास्त गुलाबाच्या फुलांची नासाडी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय 85 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी वढेरा शनिवारी छत्तीसगडमधील नया रायपूर येथे पोहोचल्या. यावेळी प्रियांकाच्या स्वागतासाठी विमानतळासमोरील रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा जाड थर टाकण्यात आला.
-
प्रियंका गांधी जी!कितनी निष्ठुर हैं आप! आपके स्वागत में @AijazDhebar जी ने सड़कों में फूल बिछा दिए, आपने उनकी तरफ देखा भी नहीं?बल्कि रायपुर शहर के प्रथम नागरिक का अपमान कर दिया,आप गाड़ी से फूलों को कुचलते हुए निकल गईं! महापौर को धक्का भी पड़ा!बेहद दुखद दुखद@priyankagandhi pic.twitter.com/PEYrRayIFY
— Rajesh munat (@RajeshMunat) February 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">प्रियंका गांधी जी!कितनी निष्ठुर हैं आप! आपके स्वागत में @AijazDhebar जी ने सड़कों में फूल बिछा दिए, आपने उनकी तरफ देखा भी नहीं?बल्कि रायपुर शहर के प्रथम नागरिक का अपमान कर दिया,आप गाड़ी से फूलों को कुचलते हुए निकल गईं! महापौर को धक्का भी पड़ा!बेहद दुखद दुखद@priyankagandhi pic.twitter.com/PEYrRayIFY
— Rajesh munat (@RajeshMunat) February 25, 2023प्रियंका गांधी जी!कितनी निष्ठुर हैं आप! आपके स्वागत में @AijazDhebar जी ने सड़कों में फूल बिछा दिए, आपने उनकी तरफ देखा भी नहीं?बल्कि रायपुर शहर के प्रथम नागरिक का अपमान कर दिया,आप गाड़ी से फूलों को कुचलते हुए निकल गईं! महापौर को धक्का भी पड़ा!बेहद दुखद दुखद@priyankagandhi pic.twitter.com/PEYrRayIFY
— Rajesh munat (@RajeshMunat) February 25, 2023
कार्यकर्त्यांनी केले प्रियंकाचे भव्य स्वागत : यावेळी रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा केलेल्या लोककलाकारांनीही सादरीकरण केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख मोहन मरकाम, पक्षाच्या इतर नेत्यांनी प्रियंका गांधी वड्रा यांचे स्वागत केले. सकाळी 8.30 च्या सुमारास प्रियंका गांधी स्वामी विवेकानंद विमानतळावर पोहोचल्या. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा नावच्या जोरदार घोषणा दिल्या.
-
स्वागत, वंदन एवं अभिनंदन… @priyankagandhi जी. #INCPlenaryInCG pic.twitter.com/OVQxMIMl2H
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) February 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">स्वागत, वंदन एवं अभिनंदन… @priyankagandhi जी. #INCPlenaryInCG pic.twitter.com/OVQxMIMl2H
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) February 25, 2023स्वागत, वंदन एवं अभिनंदन… @priyankagandhi जी. #INCPlenaryInCG pic.twitter.com/OVQxMIMl2H
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) February 25, 2023
प्रियंका गांधीवर गुलाबांचा वर्षाव : प्रियांका गांधी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबत कारमधून विमानतळावरून बाहेर पडल्या. त्यांच्यासोबत इतर नेत्यांच्या वाहनांचा ताफाही होता. यावेळी गांधींनी शहरात ठिकठिकाणी उभ्या असलेल्या समर्थकांना अभिवादन केले. मागच्या सीटवर बसलेल्या सीएम बघेल यांनीही हात हलवून समर्थकांना प्रोत्साहन दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे विमानतळापासून सुमारे 2 किमीपर्यंत रस्त्यावर गुलाबांच्या फुलांचा सडा टाकण्यात आला होता. तसेच कार्यक्रमस्थळी पक्षाच्या समर्थकांनी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावरही गुलाबांचा वर्षाव केला होता.
महापौरांनी फुलांची केली व्यवस्था : रायपूरचे महापौर एजाज ढेबर म्हणाले, रस्ता सुशोभित करण्यासाठी 6 हजार किलोपेक्षा जास्त गुलाबांचा वापर करण्यात आला आहे. आमच्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी मी नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. प्रियंकाच्या स्वागतासाठी, संमेलनस्थळाच्या मार्गावर ठिकठिकाणी व्यासपीठे तयार करण्यात आली होती, जिथे समर्थकांनी त्यांच्यावर गुलाबांचा वर्षाव केला.
होर्डिंग्जने शहर व्यापले : विमानतळ ते अधिवेशनस्थळापर्यंतचा रस्ता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या रंगीबेरंगी पोस्टर्स आणि होर्डिंग्सने सजले आहे. 'भारत जोडो यात्रे'च्या दरम्यान प्रसारित करण्यात आलेले संदेश होर्डिंग्जमध्ये लिहले आहेत. देशाला एकत्र आणण्यासाठी, प्रेम पसरवण्यासाठी असे संदेश होर्डिंग्सवर लिहण्यात आले आहे. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी देखील नया रायपूर येथे पोहोचले आहेत.