ETV Bharat / bharat

Morbi Bridge Collapse Chargesheet : मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, 1200 पानांमध्ये १० आरोपी - ओरेवा समूह एमडी जयसुख पटेलचा आरोपी म्हणून समावेश

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी आज सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये १० आरोपींचा समावेश आहे. जवळपास १२०० पानांचे हे दोषारोपपत्र असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Morbi bridge collapse: Chargesheet filed, Oreva MD Jaysukh Patel named as accused
मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, १० आरोपी.. १२०० पानांचा समावेश
author img

By

Published : Jan 27, 2023, 1:47 PM IST

मोरबी (गुजरात) : गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील मोरबी शहरात घडलेल्या झुलता पूल कोसळण्याच्या घटनेत पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये 135 लोकांचा मृत्यू झाला होता. 1,200 हून अधिक पानांचे हे आरोपपत्र मोरबी सत्र न्यायालयात पोलीस उपअधीक्षक पी.एस. झाला यांनी दाखल केले. झाला जे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. आधीच तुरुंगात असलेल्या नऊ आरोपींव्यतिरिक्त ओरेवा ग्रुपचा जयसुख पटेल ज्याच्याकडे पुलाचे व्यवस्थपन होते, त्याचे नाव आरोपपत्रात दहावा आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे.

देखभालीची जबाबदारी होती कंपनीवर : 30 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या पूल कोसळल्याच्या घटनेच्या संदर्भात मॅजिस्ट्रेट कोर्टाने जयसुख पटेल याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर १ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. कोसळलेल्या मच्छू नदीवरील ब्रिटीशकालीन झुलत्या पुलाच्या व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी अजंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (ओरेवा ग्रुप) या कंपनीवर होती. त्यामुळे त्या कंपनीच्या लोकांचेही नाव यामध्ये घेण्यात आले आहे.

आरोपींच्या जामिनावर १ फेब्रुवारीला सुनावणी : मोरबी पुलाच्या नूतनीकरणाचे कंत्राट असलेल्या ओरेवा ग्रुपच्या जयसुख पटेलच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्याला ७० दिवसांपासून अटक करण्यात आलेली नाही. अद्याप कोणतीही लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली नाही, असे सरकारी वकील संजय व्होरा यांनी काल एएनआयला सांगितले. विशेष म्हणजे, या खटल्यात अटकपूर्व जामिनासाठी पटेल यांनी २० जानेवारी रोजी मोरबी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील हजर नसल्याने सुनावणी १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

जास्त लोक एकाचवेळी गेल्याने दुर्घटना : आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान एफएसएलचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पुलाच्या दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी ओरेवा ग्रुपवर सोपवण्यात आली होती. अपघाताच्या दिवशी 30 ऑक्टोबर रोजी 3165 तिकिटे देण्यात आली होती. इतके लोक पुलावरून गेले तर काय होईल याचा विचार तिकीट देणाऱ्याने केला नाही. पुलावर दोन तिकीट काउंटर सुरू होते आणि दोन्ही व्यक्तींना एकमेकांच्या काउंटरवरून किती तिकीट निघाले याची माहिती नव्हती, त्यामुळे दुर्घटना झाली.

पुलाची झाली होती दुरावस्था : झुलत्या पुलाच्या मुख्य भागाला गंज चढला होता. त्याचे बोल्ट सैल झाल्याचे अहवालात उघड झाले. पी सी जोशी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, मोरबी यांच्यासमोर पुरावे सादर करण्यात आले आहेत. या घटनेतील आरोपी अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल आणि मुकेश चौहान या तीन सुरक्षा रक्षकांना कोणतेही प्रशिक्षण दिलेले नव्हते. ते कामगार कंत्राटी होते. तसेच, मॅनेजरला त्यांच्या कर्मचार्‍यांना समजावून सांगावे लागले की, पुलावरून केवळ 100 लोकच जाऊ शकतात, परंतु व्यवस्थापकाने तसे केले नाही. पुलाच्या केबलला गंज चढला तसेच पुलाला जोडलेल्या दोऱ्याही बदलण्यात आल्या नाहीत.

हेही वाचा: Morbi Photos मोरबी केबल पूल कोसळल्याची हृदयद्रावक घटना ते सैन्यदलाचे बचावकार्य पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.