ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 :  लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास ठराव, गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब - लोकसभा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर हिंसाचाराच्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आज विरोधक लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. दिवसभरासाठी गदारोळातच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Parliament Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 26, 2023, 7:26 AM IST

Updated : Jul 26, 2023, 3:00 PM IST

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आजही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

Live Update :

  • Lok Sabha adjourned till 2 pm amid sloganeering by the Opposition MPs who are demanding the PM's presence in the House for discussion on Manipur. pic.twitter.com/vSJTsQRR9a

    — ANI (@ANI) July 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • लोकसभा पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब : लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या ठरावाला मंजुरी दिली आहे. मात्र लोकसभेत विरोधकांनी प्रचंड प्रमाणात गदारोळ केल्याने लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
  • Lok Sabha Speaker Om Birla accepts the No Confidence Motion against Government moved by the Opposition.

    The Motion was brought to the House by Congress MP Gaurav Gogoi. pic.twitter.com/1HbArz5B7N

  • लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब : लोकसभेत विरोधकांनी मोठा गदारोळ केला आहे. त्यामुळे लोकसभा सभापतींनी लोकसभेचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केले आहे. विरोधकांनी लोकसबेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
  • #WATCH | Lok Sabha Speaker Om Birla allows the No Confidence Motion against Government moved by the Opposition.

    Speaker says, "I will discuss with the leaders of all parties and inform of you of an appropriate time to take this up for discussion." pic.twitter.com/vsUmR42Kmz

  • मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव : विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
  • कारगील विजय दिनी शहीद जवानांना आदरांजली : भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावून कारगील खोऱ्यातून पाकिस्तानच्या सैन्याला हुसकावून लावले होते. मात्र या हल्ल्यात अनेक भारतमातेच्या सुपूत्रांना प्राणाची बाजी लावावी लागली. त्यांचे स्मरण करण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभेत आज कारगील विजय दिनी जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब : मणिपूर हिंसाचारावरुन लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर संसदेत निवेदन न केल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेत विरोधक आक्रमक झाले होते. आपचे नेते संजय सिंह यांनी वेलमध्ये उतरुन निदर्शन केल्यामुळे त्यांचे राज्यसभा सभापतींनी निलंबन केले. त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले. विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडल्याने लोकसभा आणि राज्यसभा वारंवार तहकूब करावी लागली.

सरकार चर्चेला तयार, मात्र विरोधक काढतात पळ : मणिपूर हिंसाचार प्रकरणांवर सरकार विरोधकांसोबत चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक सभागृहातून पळ काढत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारने विरोधकांना महिला अत्याचाराच्या प्रकरणावरुन संसदेत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधक आज दाखल करणार अविश्वास प्रस्ताव : मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांचे 26 पक्षाचे नेते या प्रस्तावात सहभागी होण्याची शक्यता आहे. मंगळवारीच विरोधक सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा विचार करत असल्याचे आपचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसनेही विरोधक सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.

  • Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury to ANI: "Today it has been decided that we won't have any other alternative but to resort to a no-confidence motion because government is not accepting to the demand of the opposition parties that on the issue of Manipur at… pic.twitter.com/X24Wtz6hRB

    — ANI (@ANI) July 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. Manipur Violence : मणिपूर विषयावर चर्चेसाठी अखेर केंद्र सरकार तयार; अमित शाहांचे विरोधकांना पत्र
  2. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचार प्रकरण, विरोधक सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

Last Updated : Jul 26, 2023, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.