ETV Bharat / bharat

Monsoon Session 2023 live: मणिपूरच्या परिस्थितीवर सभागृहात जोरदार घोषणाबाजी, लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

पावसाळी अधिवेशनात संसदेचा बराचसा वेळ गदारोळात गेला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभागृहाच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अधिवक्ता (संशोधन) विधेयक आणि दिल्ली विधेयकावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहण्यास मिळत आहे. मणिपूरच्या परिस्थितीवरुन विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन
संसदेचे पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jul 31, 2023, 10:33 AM IST

Updated : Jul 31, 2023, 11:49 AM IST

नवी दिल्ली: दोन दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचे मान्सून सत्र आज परत सुरू झाले आहे. आतापर्यंत संसदेचे कामकाज वादामुळे चर्चेत राहिले असून आज सभागृहात जबरदस्त गदारोळ पाहण्यास मिळाला. लोकसभेत मणिपूरच्या परिस्थितीवरुन विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीच्या गदारोळात लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान विरोधीपक्षांच्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावरुन परतले आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात मणिपूर हिंसाचारावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज राज्यसभेत अधिवक्ता (संशोधन) विधेयक सादर केले जाणार आहे.

दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा: अधिवक्ता कायदा 1961 मध्ये सुधारणा करणारे अधिवक्ता (संशोधन) विधेयक 2023 आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करणार आहेत. तसेच लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्ली सेवा विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाचे नाव बदलण्यात आले आहे. त्याचे नाव बदलून दिल्ली दुरुस्ती विधेयक 2023 असे करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी पाठवण्यात आले आहे.

  • Lok Sabha adjourned till 2pm amid sloganeering in the House over the Manipur situation.

    — ANI (@ANI) July 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपच्या विरोधाला काँग्रेसचा पाठिंबा: दिल्लीत सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाकडून दिल्ली दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहे. या विधेयकावरुन काँग्रेस आणि आपमध्ये वाद निर्माण झाला होता. जर काँग्रेसने आपल्या विरोधाला पाठिंबा दिला तरच आपण विरोधीपक्षांच्या दुसऱ्या बैठकीत हजर राहू, असे आपकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधेयकाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीच्या विरोधाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले तर याला विरोध केला जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.

डोंगराळ भागातील कुकी लोक खोऱ्यात जाऊ शकत नाहीत,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मणिपूरमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही दुष्परिणाम झाला आहे. यासर्व गोष्टी आम्ही राज्यपालांना सांगितल्या आहेत-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी

  • #WATCH | Leader of the House in Rajya Sabha, Piyush Goyal says "We want discussions on Manipur to take place in Parliament today at 2 pm. They (Opposition) are trying to misuse the liberty given to the members. The govt is ready to discuss Manipur, but they (Opposition) have… pic.twitter.com/Bs37pxMbD8

शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट: इंडिया आघाडीतील 21 खासदारांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांचा मणिपूर दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यपाल अनसूया उईके यांची भेट घेतली. राज्यपालांना त्यांनी निवेदनही दिले. राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मणिपूरच्या खोऱ्यातील मैतेई रहिवासी हे डोंगराळ प्रदेशात जाऊ शकत नाहीत.

  • I.N.D.I.A parties floor leaders to meet Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar and Lok Sabha Speaker Om Birla and will demand that the MPs delegation who visited Manipur should be allowed to speak in their respective House to tell the ground reality of Manipur: Sources

हेही वाचा-

  1. Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक सलग सातव्या दिवशी आक्रमक, लोकसभा सोमवारपर्यंत तर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
  2. Parliament Monsoon Session 2023 : लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास ठराव, गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब

Last Updated : Jul 31, 2023, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.