ETV Bharat / bharat

Monsoon Session 2023 : मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी - अधिवेशनात आज बराच गोंधळ होण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला आहे. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभा आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. तसेच अविश्वास प्रस्तावाच्या मतदानसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी व्हिप जारी केला आहे.

Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 10, 2023, 12:02 PM IST

Updated : Aug 10, 2023, 3:08 PM IST

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरावावरील चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. आज विरोधकांच्या इंडिया या आघाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज बराच गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. लोकसभा सुरू होताच विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा 12 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

Live Update :

  • राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप - मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप निघाले आहेत. अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता लागली आहे.
  • अविश्वास ठराव प्रस्तावाच्या मतदानासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांनीही आपापल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या बाजूने मतदान करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
  • विरोधकांचा वॉकआऊट : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण या अविश्वास प्रस्तावावर बोलत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डीएमकेच्या खासदारांनी वॉकआऊट केला. निर्मला सितारामण यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्यामुळेच विरोधक घोषणाबाजी करत बाहेर गेले.
  • Congress, NCP and DMK MPs stage a walk-out from the Lok Sabha as Union Finance Minister Nirmala Sitharaman speaks on the No Confidence Motion. pic.twitter.com/EmTSkMsQeD

    — ANI (@ANI) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • डीबीटीने जगासमोर ठेवला आदर्श : डीबीटी पद्धतीने देशात प्रचंड यश मिळवले आहे. ही योजना प्रचंड यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसने या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस काळात डीबीटीचे करोडो रुपये गेले कुठे असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांनी लोकसभेत केला. डीबीटी ( Durect Benefit Transfer ) या योजनेला नरेंद्र मोदी सरकराच्या काळातच प्रचंड यश मिळाल्याचा दावा निर्मला सितारामण यांनी केला.
  • #WATCH | Union FM Nirmala Sitharaman says, "Our DBT story sets an example for the rest of the world. I recognise the operationalisation of DBT by UPA but only Rs 7,367 crores were transferred in 2013-14. From that amount, DBT transfers have increased 5 times by 2014-15 itself. In… pic.twitter.com/bVIWhyi50X

पंतप्रधान नरेंद्र मोदी परमात्मा आहेत का ? : काँग्रेसचे नेते पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. आज राज्यसभेत काँग्रेस नेते तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनात आल्यानंतर त्यांच्या पुढे आम्ही आमचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र यावेळी विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनीही मोठी घोषणाबाजी केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यामुळे काय होईल, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सांगितले. त्यावर भाजपच्या खासदारांनी गोंधळ केल्यानंतर पंतप्रधान परमात्मा आहेत का, का भगवान आहेत, असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. त्यामुळे चांगलाच वाद झाला. वाढलेल्या गोंधळामुळे सभापतींनी राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करत असल्याची घोषणा केली.

  • #WATCH | Rajya Sabha LoP Mallikarjun Kharge says, "...Pradhan Mantri ke aane se kya hone wala hai, kya parmatma hai woh? Yeh koi bhagwan nahi hai"

    (Source: Sansad TV) pic.twitter.com/EBZddWW3tu

राहुल गांधीच्या कथित फ्लाईंग किसवरुन वाद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस केल्याचा आरोप भाजपाच्या महिला खासदारांनी केला. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला आहे. भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधत लोसकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • #WATCH | West Bengal BJP MP Sukanta Majumdar says, "Today is an important day in the Parliament, especially for the Opposition. PM Modi will speak for over an hour. The Opposition should be ready for it.

    On Rahul Gandhi's 'flying kiss' row, he said "This shows his interest and… pic.twitter.com/SVymFCvEaX

अगोदर झप्पी मग मारला डोळा, आता काय काय पहावे लागणार : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाच्या खासदारांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी या अगोदर संसदेत मोदींना झप्पी दिल्ली होती. त्यानंतर संसदेत राहुल गांधी यांनी डोळाही मारला होता. आता पुढे ते काय-काय करणार आहेत, ते पाहावे लागणार असल्याचे भाजपाचे पश्चिम बंगालचे खासदार सुकांता मुजुमदार यांनी यावेळी स्पष्ट केले. ही राहुल गांधी यांची संस्कृती असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संसदेच्या अधिवेशनात चांगलीच धुव्वाधार बॅटींग करणार आहेत, अशी चर्चा आहे. विरोधकांची धुलाई होणार असल्याने त्यांना आम्ही बोरोलिन पुरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड ते दोन तास संसदेत बॅटींग करणार असल्याने हा विरोधकांसाठी महत्वाचा दिवस असल्याची खिल्लीही त्यांनी यावेळी उडवली.

हेही वाचा -

  1. Amit Shah : शरद पवारांचा उल्लेख करून अमित शाहांचा सुप्रिया सुळेंना टोला, म्हणाले..
  2. Monsoon Session 2023 : अविश्वास प्रस्तावारील चर्चेचा आज तिसरा दिवस; विरोधकांच्या आरोपाला पंतप्रधान आज काय देणार उत्तर?

Last Updated : Aug 10, 2023, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.