संगरूर (पंजाब): पंजाबमधील एका गावात माकडांनी दहशत माजवली आहे (Monkeys terror in school). कदाचित अशाप्रकारची बातमी तुम्ही याआधी कधी ऐकली नसेल किंवा पाहिली नसेल. मुलं आणि पालक सर्वसाधारणपणे शाळेत जाताना दप्तर घेऊन जातात. मात्र येथील पालक सोबत एक काठी बरोबर नेतात. मुले आणि त्यांचे पालक शाळेत काठ्या घेऊन जाताना बघून तुम्हला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे.
संगरूर जिल्ह्यातील आलमपूर गावात हे चित्र दिसते. मुलांचे रक्षण करण्यासाठी कुटुंबातील लोक काठ्या घेऊन शाळेत जातात (Monkey terror in school at Alampur in Panjab). त्याचे कारण म्हणजे सतावणारी माकडे. केवळ मुलेच नाही तर शाळेतील शिक्षकही शाळेच्यात माकडांना हाकलण्यासाठी लाठ्या-काठ्या घेऊन जातात. याबाबत मुलांना आणि शिक्षकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमचे पालक आमच्यासोबत शाळेत येतात आणि त्यांच्या हातात काठ्या असतात, कारण माकडे आमच्यावर हल्ला करतात. मुलांनी सांगितले की, वर्गात असतानाही कधीकधी माकडे येतात. मग आम्हाला शिकवणारे शिक्षक अभ्यास सोडून माकडांचा पाठलाग करू लागतात. त्यामुळे आमच्या अभ्यासाचाही घोटाळा होतो. ते म्हणाले की, आम्ही एकटे वर्गाबाहेरही जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही पंजाब सरकारकडे या माकडांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
याबाबत गावातील लोकांशी संवाद साधला असता, गावातील लोकांनी सांगितले की, माकडांची भीती इतकी आहे की, गावात कोणीही आपल्या मुलीचे लग्न करण्यास घाबरते. कारणा माकडे त्यांच्याकडील वस्तू चोरतात. घरांची तोडफोड करून जे काही सामान रेफ्रिजरेटरमध्ये असते ते घेऊन जातात. आता या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीचे आवाहनही केले आहे. शाळेतील शिक्षिका गीता राणी म्हणाल्या की, माकडांची भीती एवढी असते की, सकाळी शाळेत येईपर्यंत गावातील लोक काठ्यांनी माकडांना शाळेतून हाकलून देतात. त्या म्हणाल्या की, तोपर्यंत आम्ही शाळेत येऊ शकत नाही कारण या माकडांनी शाळेतील सहा मुले, दोन शिक्षक आणि एका मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्याला जखमी केले होते.
या माकडांनी शाळेतील अनेक वस्तूंचीही तोडफोड केल्याचे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. गावातील सरपंच दलविंदर सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण गाव या माकडांच्या दहशतीने अनेक दिवसांपासून त्रस्त आहे. या माकडांच्या दहशतीतून आमची सुटका करावी, असे आवाहनही आम्ही सरकारला करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावचे सरपंच सांगतात की, आमच्याकडे तीन ते चार एकर पंचायतीची जमीन आहे. सरकारने ही माकडं तिथे सोडून त्याभोवती जाळी टाकावी जेणेकरून ती बाहेर पडू शकणार नाहीत.