ETV Bharat / bharat

SCO SUMMIT व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून पंतप्रधान होणार सहभागी; परराष्ट्रमंत्री थेट परिषदेत राहणार हजर - ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोमाली रहमान

शांघाय परिषदेची बैठक ही ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोमाली रहमान यांच्या अध्यक्षेताखील होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय प्रतिनिधींचे नेतृत्व करणार आहेत. सविस्तर वाचा.

पंतप्रधान परराष्ट्रमंत्री
पंतप्रधान परराष्ट्रमंत्री
author img

By

Published : Sep 15, 2021, 4:12 PM IST

नवी दिल्ली - शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) 21 वी परिषद ही 17 सप्टेंबरला दुशान्बेमध्ये होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन उपस्थित होणार आहेत. तर परराष्ट्रमंत्री हे प्रत्यक्ष बुधवारी उपस्थित राहणार आहेत.

शांघाय परिषदेची बैठक ही ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोमाली रहमान यांच्या अध्यक्षेताखील होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय प्रतिनिधींचे नेतृत्व करणार आहेत. दुशान्बेमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या समितीची बैठक ऑनलाईन आणि प्रत्यक्ष उपस्थितीत अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. परिषदेचा 20 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे यंदा परिषदेची बैठक विशेष महत्त्वपूर्ण असणार आहे.

हेही वाचा-जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश

गेल्या 20 वर्षातील कामाचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच संघटनेकडून भविष्यातील असलेल्या विविध संधीबाबत चर्चा केली जाणार आहे. महत्त्वाच्या प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

एससीओमध्ये रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, कझाकिस्तान, क्रिझीस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.

हेही वाचा-दिल्लीतील सहा संशयित दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी, मुंबईतील एकाचा समावेश, महाराष्ट्रही होता निशाण्यावर

जून 2021 मधील एससीओच्या बैठकीत भारताची कठोर भूमिका

भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात शांघाय सहकार्य संस्थेत (एससीओ) कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्यासाढी जागतिक कृती कार्यक्रम निश्चित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एससीओ बैठकीत ठेवला. दहशतवाद्यांना आर्थिक रसद मिळत असताना त्याविरोधात एससीओ आणि एफएटीएफमध्ये सामजंस्य करार करावेत, अशी मागणी अजित दोवाल यांनी या बैठकीत केली.

हेही वाचा-हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया, पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.