नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
कोरोनाबाबत पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक; ऑक्सिजन पुरवठ्याची ठाकरे, केजरीवाल यांची मागणी
12:38 April 23
12:24 April 23
- केजरीवाल यांनी या बैठकीचा वापर राजकारण करण्यासाठी केला. ते ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत बोलले, मात्र रेल्वे प्रशासनाशी त्यांनी याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. तसेच, त्यांनी विमानाने ऑक्सिजन आणण्याबाबत सांगितले, मात्र ते सरकार आधीच करत आहे. - केंद्र सरकार.
- केजरीवाल यांनी लसीच्या किंमतीबाबतही बैठकीत खोटी माहिती दिली. त्यांना हे पक्कं माहिती आहे, की केंद्र सरकार सर्व लसी राज्यांनाच देतं, आणि स्वतःकडे एकही डोस ठेवत नाही. - केंद्र सरकार.
- केजरीवाल यांनी आपल्या संपूर्ण भाषणात या परिस्थितीवर उपाय सुचवण्याऐवजी केवळ राजकारण केले. - केंद्र सरकार.
12:18 April 23
दिल्लीमध्ये ऑक्सिजन प्लांट नाही म्हणून दिल्लीकरांना ऑक्सिजन मिळणारच नाही का? केजरीवालांचा सवाल
दिल्लीमध्ये सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजन प्लांट नाही म्हणून दिल्लीकरांना ऑक्सिजन मिळणारच नाही का? जर दिल्लीसाठी पाठवण्यात आलेले ऑक्सिजन टँकर दुसऱ्या राज्यांमध्ये थांबवून ठेवले जात असतील, तर मी केंद्रामध्ये कोणाकडे याबाबत तक्रार करायची हे कृपया मला सांगा, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीत म्हणाले.
12:14 April 23

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र आपल्या हक्काच्या ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केंद्राकडे करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली होती.