नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई एक्स्पो 2020 मध्ये इंडिया पॅव्हिलियनचे व्हिडिओ कॉन्फरन्सचे उद्घाटन केले. भारत हा नवसंशोधन आणि गुंतवणुकीकरिता खुला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की भारत एक्स्पोमधील सर्वात मोठ्या पॅव्हिलियनमध्ये सहभागी होत आहे. हा एक्स्पो संयुक्त अरब अमिराती आणि दुबईबरोबरील ऐतिहासिक आणि दृढ संबंध आणखी वाढवेल, असा विश्वास आहे.
हेही वाचा-उत्तरप्रदेशात फटाख्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू
पॅव्हिलियनमधील व्हेन्युच्या कार्यक्रमात भेट द्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की दुबईमधील एक्स्पोमध्ये भेट द्यावे, असे आवाहन करत आहे. आमच्या देशात येऊन आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्याच्या अमर्यादित गोष्टींचा विस्तार करा.
तीन दिवसांच्या दौऱ्यावरून नुकतेच मोदी भारतात परतले-
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर 26 सप्टेंबरला नवी दिल्लीला परतले. पालम विमानतळावर पोहोचल्यानंतर मोदीसमर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह, माजी आरोग्य मंत्री हर्षवर्धन, दिल्ली भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. ढोल आणि नगारा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.