ETV Bharat / bharat

Modi Criticizes Congress : कॉंग्रेसचा करार हा अर्बन नक्षलवाद्यांशी - नरेंद्र मोदी - काँग्रेस उद्ध्वस्त झाली

Modi Criticizes Congress : कॉंग्रेसचा करार हा अर्बन नक्षलवाद्यांशी (Congress Contract with urban naxalites) आहे. (Bhopal workers meeting) काँग्रेससाठी गरीबांची वस्ती ही पिकनिकचे व्हिडिओ शूट करण्याचे ठिकाण बनले आहे. काँग्रेसने गरीब शेतकऱ्याच्या (Modi interaction with workers) शेताला फोटो सेशनसाठीचे मैदान (MP assembly election) बनवले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भोपाळ येथे आज (सोमवारी) कामगारांशी हितगुज साधले. यावेळी ते बोलत होते.

Modi Criticizes Congress
नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 4:29 PM IST

भोपाळ Modi Criticizes Congress : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेल्या पी एम नरेंद्र मोदींनी सरकारच्या कामांची जंत्रीच वाचून दाखवली. तर दुसरीकडे त्यांनी काँग्रेसला पावसात ठेवलेले गंजलेले लोखंड असल्याचे संबोधले. ते म्हणाले की, काँग्रेस आता अशी कंपनी बनली आहे ज्यामध्ये घोषणांपासून ते नेत्यांपर्यंत सर्व काही आऊटसोर्स केले जाते. काँग्रेसचे नेते काँग्रेस चालवत नाहीत. ती कंत्राटावर सुरू आहे. हा करार अर्बन नक्षलवाद्यांशी त्यांनी केला आहे. त्यामुळेच काँग्रेस सतत पोकळ होत आहे. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन म्हणजे साहसी पर्यटन आहे. काँग्रेससाठी गरीबांची वस्ती ही पिकनिकचे व्हिडिओ शूट करण्याचे ठिकाण बनले आहे.

काँग्रेसने इच्छाशक्ती गमावली : भोपाळमधील कार्यकर्ता महाकुंभमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि भाजपा सरकारमधील फरक स्पष्ट केला (PM Modi Bhopal). अहंकारी आघाडीसोबतच पक्ष म्हणून काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ते म्हणाले की, काँग्रेस हे गंजलेले लोखंड बनले आहे. काँग्रेसने आपली इच्छाशक्ती गमावल्याचेही ते म्हणाले. तळागाळातील नेते तोंडाला कुलूप लावून शांत बसले आहेत. आधी काँग्रेस उद्ध्वस्त झाली, आता मोडीत निघाली आहे. आता काँग्रेसने त्यांचा ठेका इतरांना दिला आहे. काँग्रेस आता काँग्रेस नेत्यांनी चालवली नाही, काँग्रेस अशी कंपनी झाली आहे ती घोषणांपासून ते धोरणांपर्यंत सर्व काही आऊटसोर्स करण्याचे कंत्राट शहरी नक्षलवाद्यांना देते.

गरिबांचे जीवन काँग्रेससाठी साहसी पर्यटन : पी एम मोदींनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की, चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या नेत्यांना गरिबांच्या जीवनाचा काहीच फरक पडत नाही. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन साहसी पर्यटन आहे. काँग्रेसने गरीबांची घरं आणि वसत्या ही पिकनिकचे व्हिडिओ शूटिंग करण्याची ठिकाण बनवली आहेत. काँग्रेसनं गरीब शेतकऱ्याचे मैदान फोटो सेशनसाठी मैदान बनले आहे. यापूर्वीही त्यांनी असेच केले होते, त्यांनी देश-विदेशातील त्यांच्या मित्रांमध्ये भारताच्या गरिबीची खिल्ली उडवली होती आणि आजही ते तेच करत आहेत. तर याउलट भाजपाचं आहे. कार्यकर्त्यांना आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि भाजपामध्ये हाच फरक आहे. प्रत्येक बूथवरील प्रत्येक मतदाराला हे समजावून सांगावे लागेल.

हेही वाचा:

  1. SC turns down ex AP CM : चंद्राबाबूंच्या याचिकेवर उद्या सुनावणी, एफआयआर रद्द करण्यासाठी तातडीची सुनावणी नाहीच
  2. CIA-style: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत अमेरिकन गुप्तचर संस्थांनी कॅनडाला दिली माहिती
  3. Vande Bharat Train : देशातील 11 राज्यांना गिफ्ट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते नऊ वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.