चैन्नई - केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत मक्कल निधी मय्यम पक्षाचे सरचिटणीस ए अरुणाचलम भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पुढील वर्षी मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांवर मतदान होणार आहे. अभिनेता-राजकारणी आणि मक्कल मक्कल निधी मय्यमचे प्रमुख कमल हासन स्वत: आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मार्गावर आहेत.
चेन्नईतील भाजपा पक्षाच्या कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत एमएनएमच्या कोअर टीममध्ये नियुक्त झालेल्या अरुणाचलम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अरुणाचलम हे व्यवसायाने वकील असून ते तुतीकोरिन जिल्ह्यातील रहिवासी आहेच.
भाजपने शेतकर्यांना पैसे देण्याचे दृष्टीने तीन शेतीविषयक कायदे केले आहेत. मी कृषी कुटुंबातून आलो आहे. शेतकर्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी मी कमल हासन यांना आग्रह केला. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर मी हा निर्णय घेतला, असे अरुणाचलम म्हणाले.
पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक -
'मक्कल निधी मय्यम', हा कमल हसन यांचा पक्ष आहे. या नावाचा अर्थ लोकांना न्याय मिळवून देणारं हक्काचं व्यासपीठ असा आहे. 16 मे 2016 रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व 234 जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. जयललिताच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाने 136 जागांसह बहुमत मिळवून सत्ता राखली. दर पाच वर्षांनी सत्तांतरण होणाऱ्या तमिळनाडूमध्ये सत्ताधारी राजकीय पक्षाने बहुमत राखल्याची 1984 नंतर ही पहिलीच वेळ होती. द्रमुक पक्षाने मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले परंतु बहुमत मिळवण्यात द्रमुकला अपयश आले. अम्मा जयललिता ह्यांनी लढवलेली ही अखेरची निवडणूक होती. डिसेंबर 2016 मध्ये आजारपणामुळे जयललिता ह्यांचे निधन झाले. त्यानंतर पन्नीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.
हेही वाचा - नव्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेसाठी केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांना पुन्हा आमंत्रण