ETV Bharat / bharat

Kavita On ED Notice : भारताची नागरिक म्हणून ईडी चौकशीला पूर्ण सहाय्य करेन - केसीआर कन्या कविता

दारू घोटाळ्या प्रकरणी आमदार कविता आज ईडीसमोर दाखल होणार आहेत. आज त्यांची चौकशी होईल. त्याशिवाय जंतर मंतर येथे महिला आरक्षण विधेयकाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन होणार आहे. त्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची मुलगी असलेल्या आ. कविता कालवकुंतला यांनी भाष्य केले आहे. विरोधी पक्ष आणि महिला संघटनांच्या सहभागातून १० मार्चला धरणे आंदोलन होणार आहे.

Kavita On ED Notice
एमएलसी कविता कालवकुंतला
author img

By

Published : Mar 9, 2023, 11:39 AM IST

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यावर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची मुलगी आणि आ. कविता कालवकुंतला यांनी आवाज उठवला आहे. आमची एकच मागणी आहे की महिलांना त्यांचा राजकीय सहभाग देण्यासाठी संसदेत जागा द्यावी. देशभरातील विरोधी पक्ष आणि महिला संघटनांसह भारत जागृती 10 मार्च रोजी जंतर-मंतर येथे एक दिवसीय शांततापूर्ण उपोषण करणार आहे. त्यासाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत एकत्र येणार आहेत. भाजप सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडावे आणि ते मंजूर करावे, या मागणीसाठी हा लढा दिला जाणार आहे असे कविता कालवकुंतला यांनी म्हटले आहे.

न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले : त्याशिवाय मला अंमलबजावणी संचालनालयाने 9 मार्च रोजी नवी दिल्ली येथे हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. कायद्याचे पालन करणारी देशाची नागरिक म्हणून मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन. तथापि, धरणे आंदोलन आणि प्रीफिक्स अपॉइंटमेंट्समुळे, मी न्यायालयापुढे उपस्थित राहू शकले नाही. त्या तारखा नेहमी बदलत गेल्या.

जुलमी राजवटीपुढे लढत राहू : केंद्रातील सत्ताधारी पक्षाने हे जाणून घ्यावे की आमचे नेते, मुख्यमंत्री श्री केसीआर आणि संपूर्ण बीआरएस पक्षाच्या विरोधात आणि आवाजाच्या विरोधात धमकावण्याचे हे डावपेच आम्हाला परावृत्त करू शकत नाहीत. मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही तुमचे डावपेच, अपयश उघड करण्यासाठी आणि भारताच्या उज्वल आणि चांगल्या भविष्यासाठी आवाज उठवण्यासाठी लढत राहू, असे कविता कालवकुंतला म्हणाल्या आहेत. मी दिल्लीतील सत्ताधार्‍यांना आठवण करून देते की, तेलंगणा जुलमी लोकविरोधी राजवटीपुढे कधीही झुकलेली नाही आणि कधीही झुकणार नाही. जनतेच्या हक्कांसाठी आम्ही निर्भयपणे आणि प्राणपणाने लढू. जय हिंद! जय तेलंगणा! असे कविता कालवकुंतला यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : K Kavitha summoned by ED : मद्यधोरण प्रकरणी कविता यांना अंमलबजावणी संचालनालया समोर 9 मार्चला दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.