ETV Bharat / bharat

Murder After Rape : अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून - दुर्ग येथील बालसुधारगृहात

२६ नोव्हेंबरला एका 10 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावर पोलिसांनी पंचनामा करून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात मुलीची बलात्कार करून हत्या केल्याची पुष्टी झाली आहे. (Murder After Rape). (Minor girl murder after rape in Bemetara)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 30, 2022, 4:11 PM IST

बेमेतरा (छत्तीसगड) : 26 नोव्हेंबर रोजी येथील कोतवाली पोलीस ठाण्याला एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या नसून मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. आरोपीला पोक्सो कायदा आणि खुनाच्या कलमांखाली अटक करण्यात आली असून आरोपीला दुर्ग येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (Murder After Rape). (Minor girl murder after rape in Bemetara)

एसपी बेमेतरा

शवविच्छेदनात सत्य उघड : २६ नोव्हेंबरला एका 10 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली यावर पोलिसांनी पंचनामा करून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात मुलीची बलात्कार करून हत्या केल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

आरोपीने गुन्हा केला कबुल : तपासानंतर पोलीसांनी मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या सुनील कुमारला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते. त्याने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहिले. कुटुंबातील सदस्य निघून गेल्यानंतर आरोपी गच्चीवरून घरात घुसला. मुलीने त्याला पाहताच आरडाओरड चालू केला. मात्र आरोपीने तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन तिच्या तोंडात बोळा भरून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने तिला फासावर लटकवले.

मृतदेह पाहून नातेवाईकांना वाटली आत्महत्या : नातेवाईक घरी परतले असता त्यांना मुलीचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. मृतदेह पाहून त्यांना ही आत्महत्या असल्याचे वाटले. आरोपीच्या कबुलीनंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केली व बाल निरीक्षण गृह दुर्ग येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.