नवी दिल्ली - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशावरुन रेल्वे मंत्रालयाने आपल्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या कामाच्या वेळेसंदर्भातील आदेश काढले आहेत. या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा दोन शिफ्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.
![ministry of railways order over shift timing to officials](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12400496_dd.jpg)
दोन शिफ्टमध्ये समावेश -
रेल्वे मंत्रालयाने असे आदेश दिले आहेत की, सर्व अधिकारी आणि कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील. त्या म्हणजे, सकाळी 7 ते दुपारी 4 आणि दुसरी म्हणजे दुपारी 3 ते मध्यरात्री 12 पर्यंत, अशा होय. दरम्यान, बुधवारीच देशाचे रेल्वेमंत्रिपदी अश्विनी वैष्णव यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या विस्तारात त्यांचा समावेश करण्यात आला. यानंतर बुधवारी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांना रेल्वे, संवाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे खाते देण्यात आले. तर आधीचे रेल्वमंत्री पीयूष गोयल यांना वस्त्रोद्याेग मंत्रालय देण्यात आले आहे.