नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल यांची नक्कल करणारे राजस्थानचे रहिवासी श्याम रंगीला यानी काल गुरूवारी (दि. 5 मे )रोजी राजस्थानमध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. ( Mimicry artist Shyam Rangeela ) निवडणूक प्रभारी विनय मिश्रा यांनी त्यांचे पार्टीत स्वागत केले. रंगीला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच, त्यांच्या मिमिक्रिला मोठी पसंतीही लोकांची आहे.
-
Comedian Shyam Rangeela joined Aam Aadmi Party. AAP's Rajasthan election in-charge Vinay Mishra inducted Shyam Rangeela into the party in Jaipur. (05.05) pic.twitter.com/WGPiJXzmfK
— ANI (@ANI) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Comedian Shyam Rangeela joined Aam Aadmi Party. AAP's Rajasthan election in-charge Vinay Mishra inducted Shyam Rangeela into the party in Jaipur. (05.05) pic.twitter.com/WGPiJXzmfK
— ANI (@ANI) May 5, 2022Comedian Shyam Rangeela joined Aam Aadmi Party. AAP's Rajasthan election in-charge Vinay Mishra inducted Shyam Rangeela into the party in Jaipur. (05.05) pic.twitter.com/WGPiJXzmfK
— ANI (@ANI) May 5, 2022
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत श्याम रंगीला यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी श्याम रंगीला यांनी दिल्ली सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकलाही भेट दिली होती. ( Mimicry Artist Shyam Rangeela Joined AAP ) त्यावेळी तेथील व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. आम आदमी पक्षात सामील झाल्यानंतर रंगीला यांनी ट्विट केले की, राजस्थानलाही 'विकासाचे राजकारण' हवे आहे. आता आम्ही विकासासह आप सोबत आहोत अस ते म्हणाले आहेत.
-
राजस्थान को भी ‘काम की राजनीति’ की आवश्यकता है, और हम ‘काम की राजनीति’ और ‘आप’ के साथ है 🙏🏽 🙂
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
धन्यवाद https://t.co/oYW9Wj8wjJ
">राजस्थान को भी ‘काम की राजनीति’ की आवश्यकता है, और हम ‘काम की राजनीति’ और ‘आप’ के साथ है 🙏🏽 🙂
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 5, 2022
धन्यवाद https://t.co/oYW9Wj8wjJराजस्थान को भी ‘काम की राजनीति’ की आवश्यकता है, और हम ‘काम की राजनीति’ और ‘आप’ के साथ है 🙏🏽 🙂
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 5, 2022
धन्यवाद https://t.co/oYW9Wj8wjJ
राजस्थान आपच्या वतीने ट्विट करण्यात आले की, राजस्थानचे प्रसिद्ध विनोदी अभिनेता श्याम रंगीला यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. श्याम रंगीला जी आपल्या व्यंगचित्राने लोकांच्या दु:खी चेहऱ्यावर हसू आणत आहेत, आता ते कलेसोबतच देशात ‘विकासाचे राजकारण’ करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या साथीने शिक्षण आणि आरोग्य क्रांतीचा जागर करणार आहेत, अस यामध्ये म्हटले आहे.
श्याम रंगीला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निवडणूक लढवण्याच्या किंवा तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षात प्रवेश केलेला नाही. पण समाजसेवा आणि विकास हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे ते परिवर्तनासाठी पक्षाशी जोडले गेले आहेत. मात्र, पक्षाने याबाबत काही आदेश दिल्यास ते पाहून निवडणूक लढवू, असेही श्याम रंगीला यांचे म्हणाले आहे.
हेही वाचा - Corona Crisis : कोरोना संकट! गेल्या दोन वर्षांत दीड कोटी लोकांनी जीव गमवला -WHO