श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) - जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी ( दि. 29 मे ) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पण, काही वेळातच दहशतवादी पिस्तूल आणि ग्रेनेड सोडून पळून गेले. ही चकमक अनंतनागच्या संद्रन नाला कुचापोरा भागात झाली. पोलीस आणि लष्कराच्या 19 आरआर पथकाने चकमकीच्या ठिकाणाहून एक पिस्तूल आणि दोन हॅण्ड ग्रेनेड जप्त केल्याचा दावा केला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिळालेल्या माहितीनुसार पोलीस व लष्कराच्या जवानांनी परिसराला वेढा घालून शोध मोहिम सुरू केली होती. दरम्यान चकमक सुरू झाली आणि सुरक्षा दलांनी काही राऊंड गोळीबार केला. त्यानंतर दहशतवादी एक पिस्तूल आणि दोन ग्रेनेड सोडून त्या भागातून पळून गेले. शस्त्रे जप्त केल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
शनिवारी ( दि. 28 मे ) अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. बिजबेहाराच्या शिटीपोरा भागात ही चकमक झाली. इशफाक गनी, अनंतनागमधील चकवानगुंड येथील रहिवासी आणि यावर अयुब दार, डोगरीपुरा, अवंतीपोरा येथील रहिवासी अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचे सदस्य होते.
हेही वाचा - Drone shot down : जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडला, मोठी घटना टळली