श्रीनगर (जम्मु-काश्मिर) - जम्मु-काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक अतिरेकी मारला गेला तर दोन जवान जखमी झाले आहेत. कानिगम परिसरात अतिरेकी लपल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरु केली होती असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शोधमोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी हल्ला चढवला होता. तेव्हा जवानांनी प्रत्युत्तर देत हल्ला केला. या हल्ल्यात एक अतिरेकी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात ठार झालेल्या अतिरेक्याची ओळख पटली नसून मृतदेह देखील मिळाला नाही. या हल्ल्यात दोन जवान देखील जखमी झाले आहेत.
याआधी पाच अतिरेक्यांचा खात्मा
याबाबतचा शेवटचा अहवाल आला त्यावेळी शोधमोहिम सुरु होती. यापुर्वी 25 डिसेंबरला बारामुलाच्या वानिगम पायीन क्रीरी परिसरात झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले होते. तर 9 डिसेंबरला पुलवाना जिल्ह्यात अल-बद्रचे तीन अतिरेकी मारले गेले होते. गेल्या काही महिन्यापासून काश्मिरमध्ये जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमकी झडत आहेत.
शरण येण्यास दिला नकार
अतिरेक्यांना शरण येण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी नकार दिला. शिवाय गोळीबारही केला. अखेर जवानांनाही गोळीबार करावा लागला. त्यात हा अतिरेकी ठार झाा आहे. अशी माहिती जम्मुचे पोलिस महानिरिक्षक विजय कुमार यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली. त्यानंतर शोध मोहीम सुरू होती.
हेही वाचा - वनडे क्रिकेटमध्ये पहिला चौकार ठोकणाऱ्या क्रिकेटपटूचे निधन