बेळगाव : काल रात्री सांगोल्ली रायण्णा यांच्या पुतळ्याची आणि सरकारी वाहनांची तोडफोड ( Sangolli Rayanna statue Vandalized ) केल्याप्रकरणी श्रीरामसेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर ( Shriramsena Hindustan President Ramakant Konduskar ) आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके ( MES Leader Shubham Shelke Arrested ) यांच्यासह २७ जणांना अटक करण्यात आली असून, बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. यासह बेळगावात कलम १४४ लागू करण्यात आले ( Section 144 In Belagaum ) आहे.
प्रतिबंधात्मक आदेश
ईटीव्ही भारतशी बोलताना बेळगावचे डीसीपी विक्रम आमटे ( DCP Vikram Amate ) म्हणाले की, "शहरातील रात्रीच्या घडामोडी लक्षात घेऊन आणि विविध संघटनांना विरोध करण्यापासून रोखण्यासाठी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. 18 डिसेंबरच्या सकाळी 8 ते 19 डिसेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सोशल मीडियावर कोणी प्रक्षोभक भाषण केल्यास आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू."
काय आहे घटना?
बेंगळुरूमधल्या संके टँक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काही लोक काळी शाई ओतत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बेळगाव येथे शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) कार्यकर्त्यांनी एकत्र येत धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथे कर्नाटक सरकारचा निषेध केला. बेळगाव येथे कर्नाटक सरकार आणि पोलिसांची सुमारे २६ वाहने फोडण्यात आली. तसेच एका हॉटेलच्या काचा, बँक, कन्नड फलकांचेही नुकसान करण्यात आले. कन्नड गुंडांनी बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आम्ही त्यांना सोडणार नाही - मुख्यमंत्री बोम्मई यांचा इशारा
या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka CM Basavaraj Bommai ) म्हणाले की, "मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कृत्याचा निषेध करतो. सरकारी मालमत्ता आणि पोलिस वाहनांचे नुकसान करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी आधीच दिले आहेत. पुतळ्यांची तोडफोड खपवून घेतली जाणार नाही. फक्त सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्यत्यय आणण्याचाच त्यांचा हेतू नसून, त्यामागे वेगळा हेतू आहे. आम्ही त्यांना थोडक्यात सोडणार नाही."
KPCC अध्यक्ष डीके शिवकुमार ( D K Shivkumar ) आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या ( LoP Siddaramaiah ) यांच्यासह काँग्रेस नेत्यांनीही या घटनेचा निषेध केला आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.