ETV Bharat / bharat

Mehbooba Mufti House Arrest : मेहबूबा मुफ्ती घरात नजरकैदेत; ट्विट करून दिली माहिती

मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर ( Mehbooba Mufti on home arrest ) लिहिले की, आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. कारण मला शोपियानमध्ये हल्ला झालेल्या काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाला ( Kashmiri Pandit visit ) भेटायचे होते. सरकारला दुफळीबाबतचा ( fake divisive narrative ) पदार्फाश होऊ द्यायचा नाही, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये केला आहे.

मेहबूबा मुफ्ती
मेहबूबा मुफ्ती
author img

By

Published : Apr 12, 2022, 9:40 PM IST

श्रीनगर - पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना ( PDP president House arrest ) 'घरात नजरकैदेत' ठेवण्यात आले आहे. ही माहिती त्यांनी स्वत: ट्विटमध्ये दिली आहे. 6 एप्रिल रोजी त्यांच्या मूळ गावात दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या शोपियान जिल्ह्यातील एका काश्मिरी पंडिताच्या कुटुंबाला भेटण्याचा हेतू होता. सुरक्षेच्या कारणास्तव माजी मुख्यमंत्र्यांना प्रवास करण्यापासून रोखण्यात आल्याचे संरक्षण ( former JK CM home arrest ) अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर ( Mehbooba Mufti on home arrest ) लिहिले की, आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. कारण मला शोपियानमध्ये हल्ला झालेल्या काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाला ( Kashmiri Pandit visit ) भेटायचे होते. भारत सरकार मुद्दाम काश्मिरी मुख्य प्रवाहात आणि पंडितांच्या पलायनास कारणीभूत असलेल्या मुस्लिमांबद्दल खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला दुफळीबाबतचा ( fake divisive narrative ) पदार्फाश होऊ द्यायचा नाही, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये केला आहे.

सैन्यदलाच्या कारवाईची चौकशी करण्याची केली होती मागणी - पीडीपीच्या अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पारिमपोरा भागात झालेल्या खोट्या चकमकीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जानेवारी 2022 मध्ये केली होती. तसेच विद्यार्थ्यांचे मृतदेह कुटुंबीयांना परत करण्याची मागणी केली होते. त्यांनी जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना पत्र लिहिले होते. अशा प्रकारच्या घटनांमुळे सैन्यदलाची बदनामी होत आहे. हे मानवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. 30 डिसेंबर 2021 ला पारिंपोरा येथे झालेल्या कारवाईत 17 वर्षांच्या तीन मुलांना ठार करण्यात आले होते.

हेही वाचा-मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर फडकवला तिरंगा; भाजप कार्यकर्त्यांना अटक

हेही वाचा-'जम्मू-काश्मीरच्या शांततेसाठी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी'

हेही वाचा-अफगाणिस्तानात बघा, काय झालं? मेहबुबा मुफ्तींचा केंद्राला थेट इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.