ETV Bharat / bharat

Mehbooba Mufti : 'जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक', मेहबूबा मुफ्तीचे सरन्यायाधीशांना पत्र

author img

By

Published : Dec 31, 2022, 3:33 PM IST

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. (Mehbooba Mufti letter to CJI). या पत्रात मुफ्ती यांनी देशातील विशेषत: जम्मू-काश्मीरमधील 'चिंताजनक स्थिती'बद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Mehbooba Mufti
मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी स्वतःच्या आणि मुलीशी संबंधित प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Mehbooba Mufti letter to CJI). या संदर्भात त्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे.

mehbooba mufti letter
मेहबूबा मुफ्तीचे सरन्यायाधीशांना पत्र

2019 पासून राज्यातील लोकांवर अत्याचार : या पत्रात मुफ्ती यांनी न्यायपालिकेवर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे. केंद्रशासित प्रदेशातील लोकांवर अत्याचार केले जात असून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी ट्विटरवर या पत्रातील मजकूर शेअर केला आहे. "2019 पासून, जम्मू आणि काश्मीर मधील नागरिकांचे मूलभूत अधिकार अनियंत्रितपणे निलंबित केले गेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या स्थापनेच्या वेळी दिलेली घटनात्मक हमी अचानक असंवैधानिकपणे रद्द करण्यात आली," असे मेहबूबा मुफ्ती यांनी या पत्रात नमूद केले आहे.

  • Wrote a letter to the Hon’ble Chief Justice of India about the worrying state of affairs in the country especially Jammu & Kashmir. Hoping for his kind intervention to ensure justice is served. pic.twitter.com/PdZ3zgZL1T

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) December 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझ्या कुटुंबाचे पासपोर्ट जप्त केले : मुफ्ती पुढे म्हणतात की, सरकारने त्यांचे, त्यांच्या मुलीचे आणि त्यांच्या आईचे पासपोर्ट रोखून ठेवले आहेत. "सामान्य नागरिक, पत्रकार, मुख्य प्रवाहातील राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यांना अशा जाचक मनमानी निर्णयांचा फटका बसला आहे जे त्यांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य पायदळी तुडवतात," असे त्या पत्रात म्हणतात.

सीमाप्रश्नावर भाजप काहीच करत नाही : या महिन्याच्या सुरुवातीला मुफ्ती यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणावावरही भाष्य केले होते. " ही अत्यंत खेदजनक स्थिती आहे" असे वर्णन करून, त्या म्हणाल्या की भाजप याबद्दल काहीही करत नाही हे दुर्दैव आहे. "त्यांनी लडाखमध्ये आमची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील जमिनीवरही कब्जा केला आहे, असे भाजपच्या एका खासदाराने सांगितले आहे. परंतु, दुर्दैवाने भाजप याबाबत काहीच करत नाही, असे मुफ्ती यांनी पत्रकारांना सांगितले".

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.