ETV Bharat / bharat

'लढायचं असेल तर राजकीय मार्गानं लढा, ईडीच्या माध्यमातून नको' - मेहबूबा मुफ्ती डीडीसी निवडणुका

जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यात गुपकर अलायन्सला चांगलाच पाठिंबा मिळाला. त्यानंतर आज (बुधवार) पीडीपी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

Mehabuba mufti
मेहबूबा मुफ्ती
author img

By

Published : Dec 23, 2020, 7:10 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये गुपकर अलायन्सला चांगला पाठिंबा मिळाला. त्यानंतर आज (बुधवार) पीडीपी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. काश्मीर सरकारवरही त्यांनी टीका केली. लढायचं असेल तर राजकीय मार्गानं लढा, ईडीच्या माध्यमातून नको, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ राज्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

माझ्या जवळ लपवण्यासाठी काहीही नाही - मुफ्ती

केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला आपल्या हातातील खेळण बनवलं आहे. माझ्याबरोबर लढायचं असेल तर राजकीय मार्गाने लढा, ईडीच्या माध्यमातून लढू नका. माझ्या जवळ लपवण्यासाठी काहीही नाही. दहशतवादाला निधी पुरवणाच्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांना यश आले नाही. आम्ही फक्त ६० जागांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्यातील ३० जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपा आत्ता घाबरली असून विधानसभा निवडणुका इतक्या लवकर घेणार नाही, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - 'आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारकडून प्रयत्न'

नेत्यांवर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप

पीडीपीच्या नेत्यांवर खोटे भ्रष्टाराचाराचे आरोप लावण्यात येत आहेत. अंजूम फाजली आणि अल्ताफ या नेत्यांच्या घरावर छापे मारण्यात आले. माजी मंत्री नईम अख्तर यांना ताब्यात घेतले. मात्र, मी जम्मू काश्मीरच्या नेत्यांसाठी आवाज उठवत राहील. काश्मीरच्या जनतेला माझ्या आवाजाची गरज आहे, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

पीडीपीला संपण्याचा प्रयत्न

भाजपा काश्मीरातून पीडीपीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने अफरातफर केली. अनेक उमेदवारांना फोडलं. पश्चिम बंगालमध्ये जे चालू आहे, तेच काश्मिरात करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप तोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.