चंदीगड - मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांवर संकट आले तर राज्यपाल पदच नव्हे कोणतेही पद तत्काळ सोडू. शेतकरी व समाजासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यासाठी पंतप्रधानांबरोबरही वाद झाल्याचे त्यांनी सांगितले. ते चरखी दादरी येथील विश्रामगृहात (satyapal malik in charkhi dadri) बोलत होते.
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक ( meghalaya governor satyapal malik ) म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी गेलो होता. पाच मिनिटातच पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर वाद झाला. शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले. तेव्हा पंतप्रधान खूप गर्विष्ठ होते. कुत्रे मेले तरी चिठ्ठी लिहिता असे पंतप्रधानांनी उत्तर दिल्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधानांनी राज्यपाल मलिक यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा-Cardillia Cruise : कार्डिलिया क्रूझमधील क्रु मेंबर कोरोना पॉझिटिव्ह.. मुरगाव बंदरात प्रवेश नाकारला
शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द करून एमएमसपीला कायदेशीर रुप देण्याची गरज
कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावर सत्यपाल मलिक ( satyapal malik on farmers protest ) यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, की सरकारने इमानदारीने शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द करून एमएमसपीला कायदेशीर रुप देण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलन समाप्त झाले नसून स्थगित झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन होऊ शकते. कृषी कायदे रद्द होणे हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. एमएसपीसाठीही शेतकरी पुन्हा एक होणार आहेत.
हेही वाचा-IRCTC Tatkal Ticket : भारतीय रेल्वेची तत्काळ तिकिटांतून चक्क 500 कोटींपेक्षा अधिक कमाई
भ्रष्टाचाराला विरोध केल्याने हटविले-
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपची सत्ता असलेल्या गोवा सरकावर टीका केली होती. ते म्हणाले होते, की कोविड काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. आपण याला विरोधही केला. मात्र आपल्या विरोधाला न जुमानता राज्यपाल पदावरून आपल्याला हटविण्यात आले, असा त्यांनी मुलाखतीत आरोप केला होता.