एमएसपीला कुठलाही धोका नाही. शेतकऱ्यांनी सुचना द्याव्यात. एमएसपी आणखी मजबूत करू. सरकार शेतकऱ्यांची शंका दूर करेल - नरेंद्र सिंह तोमर
शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यास तयार, सरकारचे शेतकरी संघटनांना आश्वासन
19:42 December 05
चर्चेच्या पाचव्या फेरीतही तोडगा निघाला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा चर्चा होणार आहे.
18:14 December 05
आम्हाला सहकारी शेती नको. त्यातून फक्त सरकारचा फायदा होईल, शेतकऱ्यांना नाही, असे शेतकरी नेत्यांनी सरकारसोबतच्या बैठकीत सांगितले.
18:14 December 05
एक वर्ष पूरेल एवढं राशन आमच्याकडे आहे. मागील काही दिवसांपासून आम्ही रस्त्यांवर आहोत. आम्ही रस्त्यावर राहावे, असे सरकारला वाटत असेल तर आम्हाला अडचण नाही. आम्ही हिंसेचा मार्ग निवडणार नाही. आंदोलन स्थळी आम्ही काय करत आहोत, याची माहिती गुप्तचर संघटना सरकारला पुरवत राहील, असे शेतकरी नेत्यांनी बैठकीत सांगितले.
17:16 December 05
मागच्या बैठकीत ज्या मुद्दयांवर सरकारने सहमती दाखवली होती. ते शेतकरी नेत्यांनी लेखी मागितले आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी प्रतिनिधींना सांगितले, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
15:10 December 05
विज्ञान भवन येथे पाचव्या फेरीतील बैठक सुरू झाली असून विविध मुद्द्यांवर आज चर्चा होणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
14:27 December 05
पाचव्या फेरीच्या बैठकीला सुरुवात
नवी दिल्ली: विज्ञान भवन येथे शेतकरी प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यातील पाचव्या फेरीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.
14:10 December 05
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर विज्ञान भवनात दाखल
दिल्ली - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर विज्ञान भवनात दाखल झाले आहे. ते कृषि कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत.
13:51 December 05
केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी विज्ञान भवनात पोहोचले
केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी विज्ञान भवनात पोहोचले आहेत. "सरकारने हे कायदे परत घ्यावे. कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची सरकारची कोणतीच ऑफर आम्ही मान्य करणार नाही," असे दोआबा किसान संघर्ष समितीचे हर्सुलिंदर सिंग यांनी सांगितले.
13:13 December 05
सिंघू बॉर्डरवर हजारोच्या संख्येने शेतकरी; दहाव्या दिवशी आंदोलन कायम
सिंघू बॉर्डरवर हजारोच्या संख्येने शेतकरी जमले आहे. आज दहाव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांची आज दुपारी २ वाजता बैठक होणार आहे.
12:41 December 05
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तामिळनाडूच्या सालेममध्ये डीएमके पक्षाची रॅली
तामिळनाडू: द्रविड मुनेत्र कळगम पक्षाचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी केंद्राच्या शेतीच्या कायद्याविरोधात सालेममध्ये निषेध मोर्चा काढला. ते म्हणाले, "आम्ही कायद्याविरोधात कोर्टात गेलो होतो. केरळ आणि पंजाबने यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे म्हणतात. मात्र, त्यांनी कोणतेही पाऊल का उचलले नाही?" असा सवाल केला.
12:37 December 05
शेतकरी आंदोलनाचे पडसाद बिहारमध्ये
बिहार - केंद्राच्या शेतीच्या कायद्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाने पाटण्यातील गांधी मैदानावर आंदोलन केले. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी सरकारने काळे कायदे मागे घेण्याची मागणी केली.
12:24 December 05
शेतकरी नेते केंद्र सरकारसोबद चर्चेसाठी सिंघू सीमेहून विज्ञान भवनासाठी रवाना
दिल्ली - शेतकरी नेते केंद्र सरकारबरोबर शेतीविषयक कायद्यांबाबतच्या पाचव्या फेरीच्या चर्चेसाठी सिंघू सीमेहून विज्ञान भवनासाठी रवाना झाले.
12:06 December 05
आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या शंका दूर होतील - कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी
आज होणाऱ्या बैठकीत शेतकर्यांच्या शंका दूर होतील. अलीकडील बैठकीत शेतकऱ्यांच्या काही विषयांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे, असे कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी म्हणाले. तसेच विरोधी पक्ष राजकारण करण्यासाठी आंदोलन करत असून ते शेतकऱ्यांना भडकावत आहे, असा आरोप कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी केला.
11:26 December 05
बुरारी निरंकारी मैदानावर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम
दिल्ली - बुरारीच्या निरंकारी समागम मैदानावर शेतकऱ्यांचे गेल्या १० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्रीय नेतृत्वासोबत आजची बैठक सकारात्मक होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असे शेतकर्याने सांगितले.
11:05 December 05
उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लूंचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू नवीन शेती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहोचले. "हे सरकार शेतकरीविरोधी आहे. सरकारने कृषि कायदे मागे घ्यावेत." अशी मागणी लल्लू यांनी केली.
10:34 December 05
कृषिमंत्र्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक; अमित शाह, राजनाथ सिंह उपस्थित
आंदोलक शेतकर्यांशी पाचव्या फेरीच्या बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि नरेंद्रसिंग तोमर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी नवी दिल्ली येथे पोहोचले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. शेतकरी आंदोलनावर पंतप्रधानांशी चर्चा केली जाणार आहे.
10:07 December 05
दुपारी २ वाजता शेतकऱ्यांशी केंद्रीय कृषिमंत्री तोमर चर्चा करणार
आज दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मला आशा आहे, की शेतकरी सकारात्मक विचार करतील आणि त्यांचे आंदोलन संपवतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे.
08:56 December 05
..तर संसदेला घेराव घालू
दिल्ली: चिल्ला सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. "आजच्या केंद्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीत काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही संसदेला घेराव घालू." अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
08:53 December 05
दिल्ली-उत्तर दिल्ली सीमा आंदोलनामुळे वाहतुकीसाठी बंद
राष्ट्रीय महामार्ग २४वरील गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गाझियाबादहून दिल्लीकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
08:51 December 05
टिकरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून
नवीन शेती कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी टिकरी येथील दिल्ली-हरियाणा सीमेवर तळ ठोकून आहेत.
08:48 December 05
आज पाचव्या फेरीची बैठक
दिल्ली: केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात आज पाचव्या फेरीची चर्चा होणार आहे.
07:25 December 05
आज पाचव्या फेरीची महत्वाची चर्चा
नवी दिल्ली - नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज (शनिवार) १०वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा सरकार आणि शेतकरी यांच्या बैठक होणार आहे. सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात होत असलेली ही पाचवी बैठक आहे. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, पियुष गोयल आणि राज्यमंत्री सोमप्रकाश उपस्थित असणार आहेत.
शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट -
नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी मारक असून ते रद्द केले जावेत, ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली भूमिका अजून कठोर केली असून ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सरकारने जर आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले जातील, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने ही काही प्रमाण नरमाईची भूमिका घेत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आजची बैठक महत्वाची -
आपल्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी भूमिका शेतकरी प्रतिनिधींनी घेतली आहे. जर आजच्या बैठकीत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असेही शेतकरी नेते गुरनाम सिंह यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाचा भडका होणार -
शेतकरी नेत्यांच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. कृषी कायदे सरकारने रद्द करावे, असे आम्ही सरकारचा ठामपणे सांगितल्याचे शेतकरी नेते म्हणाले. ५ डिसेंबरला देशभरात पंतप्रधान मोदींची प्रतिमा दहन करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. तर आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिल्याचे भारतीय किसान युनियनचे महासचिव एच. एस लखोवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेत सांगितले.
शेतकरी आंदोलनावरून विरोधी पक्षांचा सरकारवर दबाव -
केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने सरकारवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. सरकारने कायद्यांवर पुन्हा विचार करावा, अशी मागणी विरोधकांनी आधी केली होती. आता कायदा रद्द करावा अशी मागणीही विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी -
पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. मोहनजीत, डॉ. जसविंर सिंग आणि पंजाबी ट्रिब्यूनचे संपादक स्वराजबीर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आपले पुरस्कार परत केले आहेत. यापूर्वी काल पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला होता.