वाराणसी - मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ ( Mauritius PM Pravind Jugnath ) आज संध्याकाळी काशीमध्ये दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. ते मंदिरातील दर्शन पूजेसह वडील अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या अस्थिकलशाचे गंगेत विसर्जन करणार आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ ( Aniruddha Jagannath ) यांची योगी आदित्यनाथ यांच्यासोबत शुक्रवारी भेट होण्याची शक्यता आहे.
वास्तविक, मॉरिशसचे पंतप्रधान ( Prime Minister of Mauritius visits varanasi ) 23 एप्रिल रोजी वाराणसीला येणार होते. परंतु त्यांच्या प्रोटोकॉलमधील बदलामुळे आता 23 ऐवजी 20 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Airport in Varanasi ) पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक ( Deputy Chief Minister Brijesh Pathak ) आणि वाराणसी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मॉरिशसचे पंतप्रधान गंगा आरतीत होणार सहभागी- विमानतळावरील स्वागतानंतर मॉरिशसचे पंतप्रधान थेट हॉटेल ताजला रवाना होतील. रात्रीच्या विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ते कुटुंबासह दशाश्वमेध घाटावर जातील. तिथे त्यांचे वडील आणि मॉरिशसचे माजी पंतप्रधान दिवंगत अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करणार आहेत. यानंतर ते पुन्हा हॉटेलवर पोहोचतील. संध्याकाळी 5 वाजता श्री काशी विश्वनाथ धामला जातील. त्यानंतर गंगा आरतीत सहभागी होणार आहेत.
प्रविंद जगन्नाथ योगी अरविंद यांची घेणार भेट- मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ दुसऱ्या दिवशी 22 एप्रिल रोजी हॉटेल ताज येथे सकाळी 9:30 ते 10:00 या वेळेत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकाळी 10 ते 10:30 या वेळेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा ताफा थेट बाबपूर विमानतळाकडे रवाना होईल. तेथून ते 11.15 वाजता दिल्लीला रवाना होतील.
भाजपकडून विशेष तयारी- मॉरिशसचे पंतप्रधान 3 वर्षांनी वाराणसीत येत आहेत. 2019 मध्ये ते वाराणसीला प्रवासी भारतीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. मॉरिशसच्या पंतप्रधानांचे आगमन होणार असल्याने काशी येथे भाजपने विशेष तयारी केली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार मॉरिशस आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी बाबतपूर विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंत भाजप कार्यकर्ते शाळकरी मुलांसह दोन्ही देशांचे झेंडे हातात घेऊन स्वागत करणार आहे.
हेही वाचा-Jahangirpuri Violence : घरे उद्ध्वस्त करून भाजपने गरीबांविरुद्ध युद्ध पुकारले आहे -ओवेसी
हेही वाचा- माँ तुझे सलाम! आनंद महिंद्रांनी शेअर केला पक्ष्याचा व्हिडिओ