आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधकांच्या प्रस्तावाला गृहमंत्री अनिल देशमुख आज प्रत्युत्तर देतील.
![राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधकांच्या प्रस्तावाला गृहमंत्री अनिल देशमुख आज प्रत्युत्तर देतील.](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_deshmukh.jpg)
आज होणार अर्थसंकल्पावर चर्चा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि कोरोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. त्यामुळे या अर्थसंकल्पावर मोठी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
![आज होणार अर्थसंकल्पावर चर्चा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_budgetmh.jpg)
पुणे भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी आज सुनावणी
पुणे भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरूद्ध अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
![पुणे भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी आज सुनावणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_khadase.jpg)
आज विधानभवनात याबाबत काँग्रेसची बैठक आहे
विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आज विधानभवनात याबाबत काँग्रेसची बैठक आहे.
![आज विधानभवनात याबाबत काँग्रेसची बैठक आहे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_mahavikas.jpg)
नाशिक जिल्ह्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन
जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व रुग्णालये वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच धार्मिक, राजकीय व सामुदायिक सोहळयांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे आदेश शहर व जिल्ह्यासाठी अनिश्चित कालावधीसाठी लागू राहतील.
![नाशिक जिल्ह्यात कोरोना आजपासून अंशत: लॉकडाऊन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_nashiklockdown.jpg)
बंगालः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या नंदीग्राम येथे जातील, १० मार्चला उमेदवारी घोषित करतील.
![मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या नंदीग्राम येथे जातील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_mamata.jpg)
आजपासून संसदेत सामान्य कामकाज, लोकसभा-राज्यसभेत कोरोना पूर्वीसारखे होईल काम.
![आजपासून संसदेत सामान्य कामकाज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_sansad.jpg)
पंतप्रधान मोदी आज भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘फ्रेंडशिप ब्रिज’ चे उद्घाटन करणार आहेत.
हा ब्रिज बांगलादेशच्या मध्यभागी फेनी नदीवर बांधला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सामील होतील.
![पंतप्रधान मोदी आज भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘फ्रेंडशिप ब्रिज’ चे उद्घाटन करणार आहेत.](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_modi.jpg)
दिल्लीः टूलकिट प्रकरणातील आरोपी निकिता जेकब याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_nilita.jpg)
अभिनेता दर्शील सफारीचा आज वाढदिवस
दर्शील सफारी हा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारा एक पुरस्कारप्राप्त अभिनेता आहे. 2007 मध्ये त्याने 'तारे जमीन पर' या चित्रपटात डिस्लेक्सिक मुलाची भुमिका केली होती.
![अभिनेता दर्शील सफारीचा आज वाढदिवस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10928554_darshal.jpeg)