ETV Bharat / bharat

Marathi Rangbhumi Din 2023 : 'मराठी रंगभूमी दिन' 2023 आज होतोय साजरा ; जाणून घ्या इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 11:42 AM IST

Marathi Rangbhumi Din 2023 : मराठी रंगभूमी दिन म्हणजे कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सवच आहे. जाणून घ्या या दिनाची सुरूवात कशी झाली.

Marathi Rangbhumi Din 2023
मराठी रंगभूमी दिन

मुंबई : मराठी थिएटर अर्थात 'मराठी रंगभूमी'ला समृद्ध वारसा आहे. मराठी रंगभूमी म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल यांचा एक ठेवा आहे. म्हणूनच हा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. हा विशेष दिवस मराठी रंगभूमीच्या दिग्गजांना आदरांजली वाहण्याची आणि या कलाप्रकाराच्या अदम्य भावनेची कदर करण्याची संधी उपलब्ध करुन देतो.

मराठी रंगभूमी दिन थोडक्यात इतिहास : जागतिक रंगभूमी दिन 27 मार्च रोजी साजरा होत असला तरी, मराठी रंगभूमी दिन मात्र 5 नोव्हेंबरलाच साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी मराठी नाट्य संस्कृती पाया घातला. सांगली येथे दिनांक 5 नोव्हेंबर येथे 1843 रोजी मराठीतील पहिल्या गद्य पदमिश्रित नाटकाचा प्रयोग रंगला होता. हा प्रयोगच नाट्यसृष्टीचा पाया ठरला. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर 'सीता स्वयंवर' हे मराठी भाषेतील पहिलं नाटक पार पडलं. तेव्हांपासून पुढे या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

मराठी रंगभूमीची वाटचाल : मराठी रंगभूमी ही केवळ अभिनेते आणि पटकथा अथवा नाटकाची संहिता नाही. त्याही पलिकडं जाऊन खरतर ती एक चळवळ आहे. ज्यात नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, नैपथ्य, वेशभुषा आणि केशभुषा कलाकार यांच्यासह उत्साही प्रेक्षक या सर्वांचा समावेश आहे. मराठी रंगभूमी दिन हा बहुआयामी कलाप्रकार घडवणाऱ्या सर्व घटकांना समर्पीत आहे. मराठी रंगभूमीचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यातील वैविध्य आहे. जे प्रायोगिक, पारंपारिक आणि लोकनाट्य प्रकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. मराठी रंगभूमी दिन हा एक असा दिवस आहे, जेव्हा या सर्व वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती एकत्र येतात. विविधतेतील एकतेला बळकटी देतात. आजवर मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात हातांचे, समर्पणांचे स्मरण या दिवशी केलं जातं.

  • मराठी रंगभूमी आणि नविन काळ : मराठी रंगभूमीची खोलवर रुजलेली परंपरा असली, तरी ती समकालीन संकल्पना आणि कथाकथन तंत्रांशी जुळवून घेत आहे. नवीन काळातील नाटककार आणि दिग्दर्शक कलेच्या सीमा ओलांडून नवीन प्रतिभेचा शोध घेत आहेत. म्हणूनच पाठिमागील काही वर्षांमध्ये मराठी नाटकांची पताका सातासमुद्रापार पोहोचली आहे.

हेही वाचा :

  1. One Health Day 2023 : मानवी आरोग्यासाठी पृथ्वी निरोगी असणं आवश्यक; जाणून घ्या काय आहे 'वन हेल्थ डे'
  2. World Stroke Day 2023 : जागतिक स्ट्रोक दिवस 2023; 'या' कारणांमुळे तुम्ही लहान वयातच होऊ शकता स्ट्रोकचे शिकार
  3. World Occupational Therapy Day 2023 : 'जागतिक ऑक्युपेशनल थेरपी दिवस' 2023; जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.