कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण 'मराठी राजभाषा दिन' असेही म्हणतात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
भाषेची महानता सांगणारा दिवस : १९९९ मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही सुरू करण्यात आले. त्यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या. मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेत आधुनिक इंडो-आर्यन भाषांमधील काही प्राचीन साहित्याचा समावेश आहे.
मराठी भाषा गौरव दिन : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते. त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. कुसुमाग्र यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले. घरोघरी पोहचलेले 'नटसम्राट' हे नाटक आणि चित्रपट त्यांच्या लिखाणाची सखोलता दर्शविते.
प्रसिध्द काव्यसंग्रह, नाटके : जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी कुसुमाग्रजांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत.
हेही वाचा : International Mother Language Day 2023: मातृभाषेतूनच आपली ओळख तीचा सन्मान करा