रांची - झारखंडमध्ये मंगळवारी एका माओवाद्याने आत्मसमर्पण केले. त्याच्या अटकेवर पाच लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
उदेश गंझू ऊर्फ सुकुल असे या माओवाद्याचे नाव असून त्याने चतरा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक ऋषभ झा यांच्यासमोर अर्ध-स्वयंचलित रायफल आणि 150 काडतुसांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - जंगली हत्तीने माणसाला पायदळी तुडवले!...पाहा व्हिडिओ
शरणागती पत्करलेला उदेश हा माओवादी संघटना तृतीया प्रसाद समितीचा उप-विभागीय कमांडर होता. त्याच्यावर चतरा आणि पलामू जिल्ह्यात आठ गुन्हेगारी खटले चालू आहेत.
राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणानुसार उदेश याचे पुनर्वसन केले जाईल.
हेही वाचा - मध्य प्रदेश : धर्मांतरणासाठी पत्नीवर दबाव आणणाऱ्या पतीला अटक