ETV Bharat / bharat

Moradabad Accident : भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर - रस्ता अपघात

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Moradabad Accident
मुरादाबादमध्ये अपघात
author img

By

Published : May 7, 2023, 6:30 PM IST

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण रस्ता अपघात झाला. येथे प्रवाशांनी भरलेल्या टाटा मॅजिकला एका डीसीएमने धडक दिली. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. टाटा मॅजिकमध्ये 26 जण प्रवास करत होते. हे सर्वजण रामपूर येथे एका विवाह सोहळ्याला जाणार होते. दरम्यान, ते अपघाताला बळी पडले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

धडकेनंतर दोन्ही वाहने पलटली : जिल्ह्यातील भगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. कोरवाकू गावातील अब्बास, भाऊ शब्बीर हे नातेवाईकांसह बहिणीच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नासाठी रामपूरला जात होते. टाटा मॅजिकमध्ये त्यांच्या कुटुंबातील 26 लोक होते. त्यांच्या टाटा मॅजिकने दलतपूर काशीराम रोडवर येताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डीसीएम वाहनाला धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर अनेक गावकरी मदतीला धावले. माहिती मिळताच पोलीसही पोहोचले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू : अपघातात दोन महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी मृतांची संख्या सात होती. संध्याकाळी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा :

  1. Umesh Pal Murder Case : ..म्हणून अतिक अहमदने केली उमेश पाल यांची हत्या, पोलीस तपासात 'हे' सत्य आले समोर
  2. Accident on Bhind Orai Highway : वऱ्हाड घेऊन जाणारी बस झाडावर आदळली, 5 जणांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी
  3. Wresters Protest : शेतकरी संघटनांचाही जंतरमंतरवरील पैलवानांना पाठिंबा, राजधानीत होणार कडक सुरक्षा व्यवस्था

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.